
Indian Cinema : एका वर्षात ३९ चित्रपट, १३० चित्रपटांमध्ये एकाच अभिनेत्रीसोबत केली स्क्रिन शेअर!
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक दिग्गज कलाकारांनी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत. आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवत कायमस्वरुपी स्मरणात राहतील अशा कलाकृतीही त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत. तुम्हाला माहित आहे का भारतीय चित्रपटसृष्टीतील अशी एक स्टार जोडी आहे ज्यांनी एकत्र १३० चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम करत विश्व विक्रम केला आहे काय आहे या जोडीचं नाव? जाणून घेऊयात…(Indian cinema)
तर, मल्याळम स्टार अभिनेते ‘प्रेम नाझीर’ (Prem Nazir) यांनी आपल्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दित तब्बल ७०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. यापैकी १३० चित्रपटांमध्ये त्यांनी एकाच अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर केली आहे. या अभिनेत्रीचं नाव होतं शीला. खरं तर प्रेम नाझीर याचं हे स्क्रिन नाव होतं; त्याचं खरं नाव होतं अब्दुल खादर. ( malayalam superstar)

६ एप्रिल १९२६ रोजी केरळमधील चिरायंकीझू येथे त्यांचा जन्म झाला. १९५२ मध्ये ‘मारुमाकल’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. पण लागलीच १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या विशापिंते (Vishappinte) या चित्रपटामुळे त्यांना लोकप्रियला मिळाली आणि त्यानंतरच त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी प्रेम नझीर असं स्वत:लाच नाव दिलं. (malayalam film industry)

प्रेम यांनी ७२० चित्रपटांमध्ये प्रमुख नायक म्हणून काम केलं आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवलं. अभिनेत्री शीलासोबत १३० चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी आणखी एक गिनीज रेकॉर्ड केला. खरं तर, ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील अखिलंदेश्वरीची नकारात्मक भूमिका साकारून ही (actress Sheel)a अभिनेत्री लोकप्रिय झाली. प्रेम आणि शीला यांनी ‘चेम्मीन’, ‘कल्लीचेल्लम्मा’, ‘वेलुथा कथरीना अकाले’, ‘ओरू पेनिंटे काधा’, ‘सरसैया’, ‘यक्षगानम’, ‘कुट्टी कुप्पयम’, ‘स्थानार्थी सरम्मा’, ‘कडथुनाट्टू मक्कन’, ‘कन्नपन उन्नी’, ‘ज्वाला’, ‘वाझवे मायाम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र कामं केली. प्रेम यांच्याबद्दल आणखी एक खासियत म्हणजे त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीत एकूण ८५ अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. (malayalam movies)

प्रेम (Prem Nazir) यांच्या नावावरील रेकॉर्डची यादी इथेच संपत नाही. प्रेम यांनी काम केलेले एकाच वर्षातील ३९ चित्रपट प्रदर्शित होण्याचाही त्यांच्या नावे रेकॉर्ड आहे. अद्याप कोणत्याही भारतीय कलाकाराला हा त्यांचा रेकॉर्ड मोडणं शक्य झालं नाही. तसेच, त्यांनी ४० हून अधिक चित्रपटांमध्ये दुहेरी किंवा तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. प्रेम यांना अनेक पुरस्कराही मिळाले असून त्यांच्या ‘विदा परयुम मुनपे’ या चित्रपटाला केरळ राज्य चित्रपट पुरस्कार (विशेष ज्युरी) मिळाला होता.(Untold story)
===============================
हे देखील वाचा: Mandira Bedi : अभिनय ते फॅशन… मंदिराच्या करिअरवर टाकूयात एक नजर!
===============================
रुपेरी पडद्याचा ‘एव्हरग्रीन हिरो’: प्रेम नझीर यांना कला क्षेत्रातील त्यांच्या सेवेबद्दल भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खरं तर फार कमी वर्ष त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं पण त्यांच्या इतका स्टारडम भाऊ किंवा त्यांच्या मुलांना जपता आला नाही. प्रेम यांचा भाऊ प्रेम नवस हा देखील अभिनेता आणि निर्माता म्हणून यशस्वी आहे. मुलगा शानवास आणि नातू शमीर खान यांनीही चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावलं आहे.(Prem Nazir history)