‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Mammootty : मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार!
भारतीय चित्रपटसृष्टीत विविध भाषांमध्ये काम करणारे बरेच कलाकार आहेत… त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे पद्मश्री मामूटी (Mammootty)… मल्याळम चित्रपटसृष्टीचा किंग अशी खरं तर त्यांची ओळख… मात्र, मामूटी यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड भाषेतही कामं केली आहेत…
मामूटी यांनी चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडण्यापूर्वी ते व्हॉलिबॉल खेळाडू होते… इतकंच नाही तर ते केरळ व्हॉलिबॉल लीगचे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर देखील होते… १९७१ मध्ये मामूटी यांनी Anubhavangal Paalichakal या मल्याळम चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली… त्यानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये कामं केल्यानंतर १९७९ मध्ये त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला… रंगभूमीपासून सुरु झालेला मामूटी यांचा प्रवास ५० वर्षांपेक्षा अधिक काळ अविरतपणे सुरु आहे… विशेष म्हणजे त्यांना आजवर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत…

मामूटी यांची खासियत म्हणजे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात आंबेडकरांची भूमिका साकारली होती… सुरुवातीला त्यांनी ज्या भूमिकेसाठी नकार दिला होता त्याच भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता… दिग्दर्शक जब्बार पटेल (Jabbar Patel) यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाबद्दल बोलताना असंख्य आठवणी सांगितल्या होत्या. बाबासाहेबांची भूमिका साकारायची म्हणजे मामूट्टी यांनी मिश्या काढणं गरजेचं होतं आणि ते करण्यास त्यांना संकोच वाटत होता. Mammootty यांच्यानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला चित्रपट ऑफर करण्यात आला होता.
====================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan रोशन यांना ‘K’ अक्षराची एवढी ओढ का?
====================================
मात्र, अगदी नम्रपणे शाहरुखने नकार दिला होता. नकाराचं कारण सांगताना शाहरुख असं म्हणाला होता की, मी इतक्या मोठ्या व्यक्तीमत्वाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारुप शकत नाही. नसीरुद्दीन शाह, नाना पाटेकर, कमल हासन यांनी सामाजिक, राजकीय चित्रपट आणि भूमिका केल्या आहेत. त्यामुळे मी हे काम करु शकत नाही.” (Bollywood masala) मात्र, नंतर त्यांनी ती भूमिका स्वीकारली आणि या चित्रपटाने इतिहासच घडवला…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi