
Gangaram Gavankar : मालवणी मनाचा नाटककार आणि ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचं निधन
मालवणी बोलीभाषेतील अजरामर ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक गंगाराम गव्हाणकर यांचं सोमवारी रात्री निधन झालं… वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला… मच्छिंद्रनाथ कांबळी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या मालवणी बोलीभाषेतील ही कलाकृती मराठी नाटकाच्या इतिहासातील एक अविभाज्य अध्याय आहे.

मराठी नाट्यसृष्टीत मालवणी नाटकांचं एक स्वतंत्र जग तयार करणाऱ्या गंगाराम यांच्यामुळे वस्त्रहरण नाटक आणि पर्यायाने मच्छिंद्रनाथ कांबळींसारखा एक हरहुन्नरी कलाकार आणि त्यांचं मालवणी भाषेवरील अलौकिक प्रेम लोकांपर्यंत पोहोचलं… परंतु, या नाटकात ‘महाभारता’ची टिंगल करण्यात आल्याचा आक्षेप घेत हे नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता… मात्र, पु.ल.देशपांडेंच्या पाठिंब्यामुळे हे नाटक अविरत सुरु राहिलं आणि नाटकाचे ५ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले…

गंगाराम गव्हाणकर उत्कृष्ट रंगकर्मी तर होतेच परंतु त्यांनी आपलं घर चालावं यासाठी एमटीएनलमध्ये नोकरी करत आपल्या नाट्यलेखनाची आवड जोपासली… १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवर बॅकस्टेजवर काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर नाट्यलेखनाचा प्रवास सुरु केला… गंगाराम यांनी ‘वेडी माणसे’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’, ‘वनरुम किचन’, ‘उष:काल’ अशा दर्जेदार नाटकांचं लिखाण केलं…

इतकंच नाही तर गंगाराम गव्हाणकर यांनी ऐसपैस ही कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांच्या चित्रांगदा या पुस्काचं मराठी भाषेत अनुवादन केलं… आणि व्हाया वस्त्रहरण हे स्वत:चं आत्मचरित्र देखील गंगाराम यांनी लिहिलं… त्यांनी या त्यांच्या आत्मचरित्रात सुरुवातीच्या दिवसात जेव्हा ते मुंबईत नवे होते तेव्हा त्यांनी स्मशानात काही दिवस घालवले असल्याचं लिहिलं आहे… मराठी भाषेसह आपली मालवणी भाषा जागतिक स्तरापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार करणारे आणि तो निर्धार पुर्ण करणाऱ्या गंगाराम गव्हाणकर यांना कलाकृती मीडियातर्फे भावपूर्ण आदरांजली.
================================
================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi