
Dr. Babasaheb Ambedkar : मल्याळम अभिनेत्याने बाबासाहेबांनी भूमिका ‘या’ कारणासाठी नाकारली होती!
भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर राजकीय नेत्यांचे बायोपिक्स आले. त्यापैकी नुकताच आलेला एक म्हणजे कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’ (Emergency) चित्रपट. आपल्या अभिनयातून प्रत्येक कलाकाराने राजकीय नेत्यांच्या भूमिका जीवंत करण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय बायोपिक म्हटल्यावर मल्याळम अभिनेते मामूट्टी यांनी २००० साली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ (Dr Babasaheb Ambedkar) या चित्रपटात साकारलेली त्यांची भूमिता आदर्श मानली जाते. मात्र, जब्बार पटेल दिग्दर्शित या चित्रपटात ममूथी यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. पण भूमिका साराल्यानंतर त्यांना याच भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. Mammootty यांनी चित्रपट का नाकारला होता याचं कारण जाणून घेऊयात…(Entertainment news)

दिग्दर्शिक जब्बार पटेल (Jabbar Patel) यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाबद्दल बोलताना असंख्य आठवणी सांगितल्या होत्या. बाबासाहेबांची भूमिका साकारायची म्हणजे मामूट्टी यांनी मिश्या काढणं गरजेचं होतं आणि ते करण्यास त्यांना संकोच वाटत होता. Mammootty यांच्यानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला चित्रपट ऑफर करण्यात आला होता. मात्र, अगदी नम्रपणे शाहरुखने नकार दिला होता. नकाराचं कारण सांगताना शाहरुख असं म्हणाला होता की, मी इतक्या मोठ्या व्यक्तीमत्वाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारुप शकत नाही. नसीरुद्दीन शाह, नाना पाटेकर, कमल हासन यांनी सामाजिक, राजकीय चित्रपट आणि भूमिका केल्या आहेत. त्यामुळे मी हे काम करु शकत नाही.” (Bollywood masala)

अखेर मामूट्टी यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) चित्रपटात त्यांची भूमिका केली होती.८.९५ कोटींच्या बजेटमध्ये तयार केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. मुळ इंग्रजी भाषेत असलेल्या या चित्रपटाचं शुटींग हिंदी आणि इंग्रजी भाषेत सोबतच करण्यात आलं होतं. बरं, शाहरुख पाठोपाठ Robert De Niro यालाही चित्रपट ऑफर केला होता. अखेर मामूट्टी (Mammootty) यांनी साकारलेल्या या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
===========================
हे देखील वाचा:संगीतकार रोशन यांना आत्मविश्वास दिला होता अनिल विश्वास यांनी!
===========================

तसेच, जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटात मामूट्टी यांनी बाबासाहेब, त्रिलोक मलिक यांनी लाला लजपतराय, मोहन गोखले यांनी महात्मा गांधी, सोनाली कुलकर्णी हिने रमाबाई यांच्या भूमिका साकारल्या होत्या.