Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mandira Bedi : अभिनय ते फॅशन… मंदिराच्या करिअरवर टाकूयात एक नजर!

 Mandira Bedi : अभिनय ते फॅशन… मंदिराच्या करिअरवर टाकूयात एक नजर!
कलाकृती विशेष

Mandira Bedi : अभिनय ते फॅशन… मंदिराच्या करिअरवर टाकूयात एक नजर!

by रसिका शिंदे-पॉल 15/04/2025

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट डोळ्यांसमोर आला की काजोल-शाहरुख (Kajol- Shah Rukh Khan) पाठोपाठ मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) चेहराही डोळ्यांसमोर येतोच. मेहंदी लगाके रखना या गाण्यात जिकरी काजोल प्रेक्षकांना आवडली तितकीच मंदिरा बेदीही पसंतीस पडली. आज १५ एप्रिल मंदिरा बेदी हिचा वाढदिवस. जाणून घेऊयात तिच्या करिअरबद्दल…(Entertainment trending news)

मंदिरा बेदी हिने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. १९९४ मध्ये दुरदर्शनवरील शांती या मालिकेतून तिने आपल्या अभिनयाचा प्रवास सुरु केला होता. त्यानंतर क्योंकी सास भी कभी बहू थी, जस्सी जैसी कोई नही, सी.आय.डी (CID), २४, आहट, ‘औरत’, ‘घर जमाई’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये सकारात्मक आणि नकारात्म अशा दोन्ही भूमिका तिने साकारल्या. (Mandira Bedi Daily soaps)

छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्याकडले वळलेल्या मंदिराला पहिलाच चित्रपट मिळाला तो म्हणजे काजोल आणि शाहरुख खानचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ). त्यानंतर ‘इत्तफाक’, ‘वोडका डायरीज’, ‘ The Tashkent Files’, ‘Identity’, ‘नाम गुम जायेगा’, ‘दस कहानिया’ या चित्रपटांमध्ये तिने कामं केली खरी पण चित्रपटांमध्ये तिचं करिअर फारसं घडलं नाही. (Mandira Bedi Films)

पुढे अभिनयानंतर मंदिरा बेदी हिने फिटनेस, फॅशन डिझायनिंग आणि सामाजिक कार्याकडे आपला मोर्चा वळवला. कालांतराने, ती केवळ एक लोकप्रिय अभिनेत्रीच नाही तर भारतातील सर्वात फॅशनेबल सेलिब्रिटींपैकी एक बनली आहे. (Fashion celebrity)

===============================

हे देखील वाचा:  Tabu And Baghban Movie : बिग बींसोबतचा चित्रपट तब्बूने का नाकारला?

===============================

मंदिरा बेदीने (Mandira Bedi) ICC विश्वचषक २००३ आणि २००७ सोबत ICC चॅम्पियन ट्रॉफी २००४, २००६ चं देखील सुत्रसंचलन (Cricket Female Anchor) केलं आहे.  तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिने १९९९ मध्ये दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांच्याशी लग्न केले होते. लग्नाला १२ वर्ष झाल्यानंतर या जोडप्याला मुलगा झाला होता. त्यानंतर मंदिरा आणि राज यांनी एका मुलीलाही दत्तक घेत आपलं कुटुंब पुर्ण केलं होतं. मात्र, दुर्दैवाने २०२१ मध्ये तिचे पती राज कौशल यांचे निधन झाले. सध्. मंदिरा बेदी फिटनेस आणि फॅशन क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. (Bollywood news)

मंदिरा काही दिवसांपूर्वी करीना कपूरच्या (Kareena Kapoor) ‘वॉट्स वुमन वॉण्ट’ या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. यावेळी अॅंकरिंगचे सुरुवातीच्या काळातील अनुभव फारसे चांगले नव्हते असं ती म्हणाली. शिवाय, दिग्गज क्रिकेटरकडून लिंगभेदाचा कसा सामना करावा लागला हे देखील तिने उघड केले.

मंदिरा बेदी म्हणाली की, ‘आता, क्रिकेट असो वा स्पॉर्ट्स टेलिकास्ट, सर्वत्र महिलांसाठी एक स्थान आहे. पण जेव्हा तुम्ही हे करणारे पहिले व्यक्ती असता तेव्हा लोक तुमच्याकडे टक लावून पाहतात. ते तुमची तपासणी करतात, तुमच्यावर टीका करतात आणि तुम्हाला सांगतात की तुम्ही तिथे असण्यास पात्र नाही. ‘ती काय करतेय?’ ती क्रिकेटवर चर्चा का करतेय? पण, सामान्य लोकांच्या मनात येणारे प्रश्न विचारण्यासाठी चॅनेलने मला स्वतःशी जोडले. त्यांना नवीन प्रेक्षक हवे होते आणि म्हणूनच त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये सामील केले. सुरुवातीला ते कठीण होते कारण लोकांची स्वीकृती खूपच कमी होती. जेव्हा तुम्ही पॅनलवर बसून माजी सैनिकांशी बोलता तेव्हा ती एक वेगळीच भाषा असते. जेव्हा तुम्ही सोफ्यावर बसून क्रिकेट सामना पाहता आणि त्यावर चर्चा करता तेव्हा ती वेगळीच गोष्ट असते. पण जेव्हा कॅमेरे तुमच्यावर असतात तेव्हा तुम्हाला त्यांची भाषा बोलावी लागते.”

मंदिराने पुढे सांगितले की लाईव्ह टेलिकास्ट झाल्यानंतर ती दररोज रडायची. ती म्हणाली की, “पहिल्या आठवड्यात माझ्या मनावर खूप भार होता. मी खूप चिंताग्रस्त होते, घाबरलेली होते. जेव्हा कॅमेऱ्याचा लाल दिवा यायचा, तेव्हा मी शांत व्हायचे. मला विश्वासही बसत नव्हता की मी तिथे आहे. मला फक्त स्वीकारले जावे असे मला वाटत होते. त्यांनी माझ्याभोवती आनंदाने राहावे असे वाटायचे. लोकांनी मला फक्त स्वीकारावे, माझ्यावर प्रेम करावे आणि मला जवळ ठेवावे. पहिला आठवडा संकोच, गोंधळ आणि चुकांनी भरलेला होता. प्रत्येक शोच्या शेवटी, मी माझे डोके धरुन रडत असे”.

पुढे ती म्हणाली की, “माझ्या दोन्ही बाजूला बसलेले दिग्गज, मी त्यांना प्रश्न विचारत असे आणि ते फक्त माझ्याकडे पाहत राहायचे. ते कॅमेऱ्याकडे वळायचे आणि त्यांना जे काही उत्तर द्यायचे ते द्यायचे, माझ्या प्रश्नाशी संबंधित काहीही नव्हते, कारण माझा प्रश्न कदाचित त्यांच्यासाठी संबंधित किंवा महत्त्वाचा नव्हता. ते खूप अस्वस्थ करणारे होते. मला अपमानित वाटले. पहिल्या आठवड्याच्या शेवटी, एक हस्तक्षेप झाला आणि चॅनेलने मला फोन केला आणि म्हटले, ‘आम्ही तुम्हाला हजार महिलांमधून निवडले आहे, आम्हाला वाटते की तुम्ही तिथे आहात. तुम्ही विश्लेषक, तज्ञ किंवा एक पत्रकार आहात. तुम्ही समालोचक नाही, तुम्ही एक सादरकर्ता आहात. बाहेर जा आणि मजा करा, त्यांना तुमचे व्यक्तिमत्व दाखवा. तो हस्तक्षेप खरोखरच फायद्याच होता, तो माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट होता. त्या दिवशी मी एक नवीन वळण घेतले”, असा अनुभव मंदिराने सांगितला.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity cricket anchor Entertainment fashion designer Featured fitness hindi daily soaps mandira bedi raj kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.