Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Mangalashtaka Returns : वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीचा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’
प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषय… त्यामुळे अनेक प्रेमकहाण्या आजवर पडद्यावर आल्या आहेत. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही अनोखी टॅगलाइन असलेला ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा नवा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. (Mangalashtaka Returns Marathi movie)

राजकीय विरोधाची पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबातील तरुण-तरुणी एकाच कॉलेजमध्ये एकत्र येतात. मात्र, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडत जातात याची रंजक कहाणी “मंगलाष्टका रिटर्न्स” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सुलट प्रेमाची उलट गोष्ट या टॅगलाइनमुळे या गोष्टीत अनेक ट्विस्ट असणार आहेत याचा नक्कीच अंदाज बांधता येतो आहे. त्यामुळेच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या पोस्टरचा लुकही अगदी फ्रेश आहे. त्यामुळे ही गोष्ट अनुभवण्यासाठी २३ मेपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. (bollywood news)
==============
हे देखील वाचा : Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांना केवळ १ रुपया देऊन ‘या’ दिग्दर्शकाने केले होते साईन
==============
शारदा फिल्म्स प्रोडक्शनच्या वीर कुमार शहा यांनी निर्मिती केलेल्या ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. चित्रपटात वृषभ शाह, शीतल अहिरराव ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासह प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राजक्ता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात, समीर पौलस्ते यांच्याही भूमिका आहेत. (Marathi entertainment news)