
“दिग्दर्शक म्हणून माझ्याच चित्रपटातून मला काढण्याचा प्रयत्न”; दिग्दर्शकाने Akshaye Khannaवर केले गंभीर आरोप
एकीकडे अक्षय खन्ना याचा ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय आणि दुसरीकडे त्याच्यावर इंडस्ट्रीतील काही लोकं आरोप करत आहेत… नुकताच ‘दृश्यम ३’ (Drishyam) चित्रपटातील त्याच्या एक्झिटचा वाद सुरु असताना आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे… बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकाने चक्क अक्षयने त्यांच्याच चित्रपटातून त्यांना काढल्याचा गंभीर आरोप केला आहे… नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात… (Akshaye Khanna)
अजय देवगण याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा तिसरा भाग २०२६ मध्ये आपल्या भेटीला येणार असून या चित्रपटातून अक्षयने अचानक घेतलेली एक्झिट वादग्रस्त झाली आहे… आता ‘सेक्शन ३७५’ (Section 375) या चित्रपटाचे लेखक मनीष गुप्ता यांनी अक्षय खन्नाच्या कामावर जोरदार टीका केली आहे. (Bollywood News)

मनीष गुप्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की, “२०१७ मध्ये जेव्हा ‘सेक्शन ३७५’ चित्रपटाचं काम सुरू होतं, तेव्हा अक्षय खन्नामुळं संपूर्ण टीमला मनस्ताप सहन करावा लागला होता. अक्षयनं या चित्रपटासाठी २ कोटी रुपये फी ठरवली होती आणि त्यानं २१ लाखे अॅडवान्स देखील घेतले होते. मात्र, ऐनवेळी त्यानं आपल्या तारखा ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाला दिल्या आणि शूटिंगसाठी लंडनला निघून गेला. यामुळं झालं असं की ‘सेक्शन ३७५’ च्या संपूर्ण क्रूला तब्बल ६ महिने रिकामं बसून राहावं लागलं होतं”, असा आरोप गुप्ता यांनी केला आहे. (Akshaye Khanna Controversy)

इतकंच नाही तर, मनीष गुप्ता यांनी चित्रपट केवळ लांबणीवरच गेला नाही तर, अक्षयने ‘राजकारण’ही केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितलं की, “अक्षय खन्नाला सेटवर सर्व गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे हव्या होत्या. जेव्हा गुप्ता यांनी त्याच्या अवास्तव मागण्यांना विरोध केला, तेव्हा अक्षयनं निर्माते कुमार मंगत यांच्यावर दबाव मला दिग्दर्शकाच्या खुर्चीवरुन हटवण्यास भाग पाडलं होतं. मी या चित्रपटासाठी ३ वर्षे काम केलं, अभ्यास केला, १६० न्यायालयीन सुनावण्यांना हजेरी लावली, पण मला फक्त लेखनाचे श्रेय देऊन बाजूला करण्यात आलं”… आता ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) आणि ‘सेक्शन ३७५’ चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी अक्षय खन्नावर केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्याची लोकांची उस्तुकता वाढली आहे…
================================
हे देखील वाचा : “आता एक सोलो चित्रपट करून बघच”; Drishyam 3च्या दिग्दर्शकाचा अक्षयय खन्नाला सल्ला
================================
दरम्यान, ‘दृश्यम ३’ च्या निर्मात्यांसोबतही अक्षयचे काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याचंही समोर येत आहे.. त्यापैकी एक मुद्दा म्हणजे अक्षयने विग घालण्याचा सल्ला दिला होता. पण निर्मात्यांना ही कल्पना आवडली नाही, कदाचित ‘दृश्यम ३’ मध्ये तो विगशिवाय दिसणार होता. परंतु, मानधन आणि विग अशा कोणत्याच मागण्यांची पुर्तता न झाल्यामुळे कदाचित ‘दृश्यम ३’ मध्ये आता नवा आयजी दिसणार आहे.. अशातच सगळीकडे सध्या जयदीप अहलावतने (Jaideep Ahlawat) अक्षय खन्नाला ‘दृश्यम ३’ मध्ये रिल्पेस केल्याची चर्चा सुरु झाली आहे… याचं उत्तर प्रेक्षकांना २ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi