
Manoj Bajpayee आणि राम गोपाल वर्मा पुन्हा एकत्र; नव्या हॉरर चित्रपटाचं पोस्टर झालं रिलीज!
बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या चांगलाच चर्चेत आहेत… नुकत्याच त्यांच्या ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende movie) या चित्रपटाची झलक समोर आली होती… अशातच आता पहिल्यादाच मनोज बाजपेयी हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे… हॉरर चित्रपटांचे बादशाह म्हणजे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा… त्यांचं दिग्दर्शन असणाऱ्या आगामी ‘पोलिस स्टेशन में भूत’ (Police Station Mein Bhoot) या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झालं आहे…

राम गोपाल वर्मा (Ram Gopar Varma) आणि मनोज बाजपेयी यांनी यापूर्वी ‘शुल’, ‘सत्या’, ‘आणि ‘सरकार ३’ साठी एकत्र काम केलं आहे… आणि आता बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा ही दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी प्रेक्षकांसमोर येणाऱ असल्यामुळे प्रेक्षक विशेष उत्सुक आहेत… मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या सोशल मिडियावर पोलिस स्टेशन में भूत चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं.. यात मनोज पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून त्यांच्या हातात लहान बाळ दिसतंय… आणि त्या पोस्टरवर लिहिलं आहे की, ‘You can’t arrest the dead’. आता नेमकं कथानक काय असणार आणि मनोज यांच्या हातात बाळ का आहे? याची उत्तरं चित्रपट रिलीज झाल्यावर मिळणार आहे… (Bollywood News)
============================
हे देखील वाचा : Manoj Bajapayee : चिन्मय मांडलेकरचा ‘इन्सपेक्टर झेंडे’ लवकरच रिलीज होणार
============================
दरम्यान, राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘पोलिस स्टेशन में भूत’ चित्रपटात मनोज बाजपेयीसोबत अभिनेत्री जिनिलिया देशमुखही (Genelia Deshmukh) दिसणार आहे… त्यामुळे बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांना राम गेपाल वर्मा यांच्या स्टाईलचा हॉरर चित्रपट पाहायला मिळणार असल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता दिवसागणिक वाढत चालली आहे… दरम्यान जिनिलिया हिने ‘सितारे जमिन पर’ चित्रपटातून १० वर्षांनंतर हिंदीत पुनरागमन केल्यानंतर हा तिचा दुसरा चित्रपट आहे… आणि लवकरच रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी‘ (Raja Shivaji Movie) चित्रपटातही जिनिलिया दिसणार आहे…(Manoj Bajpayee movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi