
Manoj Bajpayee : पहिल्यांदाच भैय्याजी दिसणार हॉरर-कॉमेडी चित्रपटात!
विविधांगी भूमिका साकारणारे मनोज बाजपेयी यांनी आजवर बऱ्यापैकी गंभीर भूमिका केल्या. पण कधीच त्यांनी हॉरर चित्रपटात काम केलं नाही. परंतु, लवकरच मनोज बाजपेयी त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवं सरप्राईज घेऊन येणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गेपाल वर्मा यांच्यासोबत मनोज बाजपेयी पुन्हा एकदा दिसणार असून लवकरच हॉरर कॉमेडी चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिग्दर्शक आणि अभिनेत्याची ही जोडी दिसणार आहे. (Manoj Bajpayee upcoming movies)
हॉरर चित्रपटांच्या यादीत राम गोपाल वर्मा यांच्या ‘भूत’ चित्रपटाचं स्थान वरच्या स्थानी आहे. शिवाय आजपर्यंत वर्मा यांनी गॅंगस्टर आणि हॉरर चित्रपट केले; पण हॉरर-कॉमेडीच्या लाटेत आता वर्मा देखील एक चित्रपट घेऊन येणार आहेत. आत्तापर्यंत या दोघांची जोडी यापूर्वी ‘सत्या’, ‘शूल’, आणि ‘सरकार ३’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये दिसली होती. तसेच, मनोज वाजपेयी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत “रामू (राम गोपाल वर्मा) माझ्यासोबत पुढचा चित्रपट बनवणार आहेत. सध्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे थोडा वेळ लागेल, पण पटकथा तयार होताच आम्ही काम सुरू करू”, असं सांगितलं होतं. (Bollywood tadaka)

चित्रपटाबद्दल अधिक बोलताना मनोज (Manoj Bajpayee) म्हणाले होते की, “हा गँगस्टर चित्रपट नसून, राम गोपाल वर्मा यांच्या खास शैलीतील असेल. आजच्या कॉर्पोरेट जगतात गँगस्टरची संकल्पना बदलली आहे, त्यामुळे हा चित्रपट त्या पार्श्वभूमीवर नसेल. रामू सरांच्या दिग्दर्शनात वेगवेगळे प्रयोग करत असतात, जी प्रत्येक दृश्याला वेगळेपण देते. त्यांच्या बंडखोर स्वभावामुळे काम करताना नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळते.” (Entertainment news)

राम गोपाल वर्मा आणि मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांचा कल्ट चित्रपट ‘सत्या’ नुकताच रि-रिलीज झाला होता. आणि आता त्यानंतर एक नवा चित्रपट येणार आहे. याबद्दल सोशल मिडियावर पोस्ट करत राम गोपाल वर्मा लिहिलतात “सत्या, कौन आणि शूल नंतर, मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की मनोज वाजपेयी आणि मी पुन्हा एकदा एका हॉरर कॉमेडीसाठी एकत्र येत आहोत. हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये आम्ही दोघांनी यापूर्वी कधीही काम केलेले नाही. मी हॉरर, गँगस्टर, रोमँटिक, राजकीय नाटक, साहसी, थ्रिलर इत्यादी चित्रपट केले आहेत, परंतु कधीही हॉरर कॉमेडी नाही.” (Horror comedy movies)
===============================
हे देखील वाचा: मनोज बाजपेयींच्या ‘सत्या’ चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण, अभिनेत्याने शेअर केल्या जुन्या आठवणी
===============================
राज गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत त्यांनी ‘रात’, ‘भूत’ (Bhoot), ‘सरकार’, ‘डार्लिंग’, ‘फुंक’, ‘सत्या’ असे अनेक कल्ट क्लासिक चित्रपट त्यांनी दिले आहेत. तर मनोज बाजपेयी यांनी ‘कौन?’, ‘घात’, ‘पिंजर’, ‘अॅसिड फॅक्टरी’, ‘तेवर’, ‘मिसिंग’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी कामं केली आहेत. (Manoj Bajpayee movies)