
Manoj Bajpayee : “मुंबईत कधीच मला आपलेपणा वाटला नाही”
चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende) हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात अभिनेते मनोज बाजपेयी प्रमुख भूमिका साकारणार आहेत… कुख्यात सीरिअल किलर चार्ल्स शोभराजला दोनदा जेरबंद करणाऱ्या मराठमोळ्या मधुकर झेंडे यांच्यावर चित्रपटाचं कथानक आधारित असून इन्स्पेक्टर झेंडेंनी मुंबईभर त्याला शोधण्याची मोहीम कशी राबवली होती हे यातून मांडण्यात आलं आहे… यात अभिनेता जिम सरभ (Jim Surbh) चार्ल्सच्या भूमिकेत असून मनोज वाजयेपी झेंडंची भूमिका साकारणार आहे… या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत मनोज यांनी मुंबई सोडण्याचा विचार मनात आल्याचं विधान केलं होतं.. नेमकं काय म्हणाले मनोज जाणून घेऊयात…
मनोज बाजपेयी यांनी ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाविषयी म्हणाले की, “जेव्हा मला सिनेमाची स्क्रिप्ट मिळाली तेव्हा वाटलं की एक गंभीर थ्रिलर फिल्म असेल. पोलिसांच्या संघर्षाची कथा असेल. पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा फार मजा आली. मला सारखं हसू येत होतं. स्क्रिप्टमध्ये कॉमेडी बळजबरी घुसवली आहे असं कुठेच वाटलं नाही. यात अभिनय करताना काहीतरी नवीन करायची संधी मिळेल असंही वाटलं.”(Entertainment News)

पुढे मनोज यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘कधी इंडस्ट्री किंवा मुंबई सोडून जाण्याचा विचार आला का?’ यावर बाजपेयी म्हणाले की,”अभिनयापासून दूर जाईन असा विचार तर माझ्या मनात कधीच आला नाही. माझं अभिनयावर खूप प्रेम आहे. पण मुंबई सारखं मोठं शहर हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे असं नक्कीच वाटलं. मुंबईत कधीच मला आपलेपणा वाटला नाही. मी आजपर्यंत या मोठ्या शहराचा होऊ शकलो नाही त्यामुळे सगळं सोडून जायचं अनेकदा मनात आलं. एक वय असं येईल जेव्हा मी खरंच हे शहर सोडेन.” त्यामुळे आता भविष्यात मनोज यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच ते मुंबईला रामराम करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…
====================================
====================================
दरम्यान, मनोज बाजपेयी इन्सपेक्टर झेंडे या चित्रपटासोबतच पहिल्यांदाच एका हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत… ‘पुलिस स्टेशन मे भूत’ (Police Station Mein Bhoot) या चित्रपटात मनोज झळकणार असून याचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे… तसेच, या चित्रपटात जिनिलिया देशमुख देखील असणार आहे…(Manoj Bajpayee movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi