मनोज बाजपेयींच्या ‘सत्या’ चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण, अभिनेत्याने शेअर केल्या जुन्या आठवणी
अभिनेता मनोज बाजपेयीचा बहुचर्चित चित्रपट ‘सत्या‘ सिनेमाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट २६ वर्षांपूर्वी म्हणजे ३ जुलै १९९८ रोजी प्रदर्शित झाला होता. या दिवसाचे औचित्य साधत अभिनेत्याने चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. मनोजने चित्रपटातील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात पोस्टर आणि सिनेमातील लोकप्रिय गाणे ‘सपने में मिलेगी है’ ची झलक आहे. हे गाणे शेफाली शाह आणि मनोज बाजपेयी यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.(Manoj Bajpayee on Satya Movie)
हे फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग, ‘मुंबईचा राजा कोण?’ लिहीला आहे. यात मनोज बाजपेयीने आपल्या शत्रूंचा खात्मा करणाऱ्या डॉन भिकू म्हात्रेची भूमिका साकारली आहे जो आपल्या दुश्मनांना संपवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर येऊन ओरडतो – ‘मुंबई का किंग कौन, भीकू म्हात्रे…’ या दमदार सीन आणि सिनेमाने मनोज बाजपेयीला स्टार बनवले होते. या चित्रपटातील इतरही अनेक डायलॉग्स खूप गाजले होते जसे ‘पूछने के लिए जिंदा रहना जरूरी होता है’’, ‘प्रत्येकाला संधी मिळते’, ‘हमें उनके डर से फायदा है…मौत से नहीं’. हे संवाद आजही बोलण्यात विनोद म्हणून वापरले जातात. मनोजने चित्रपटातील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात पोस्टर आणि लोकप्रिय गाणे ‘सपने में मिलेगी है’ची झलक आहे.
मुंबईच्या अंडरवर्ल्डवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यात मनोज बाजपेयीने आपल्या शत्रूंचा खात्मा करणाऱ्या डॉन भिकू म्हात्रेची भूमिका साकारली आणि तो समुद्रकिनाऱ्यावर येऊन ओरडतो – ‘मुंबईचा राजा कोण, भिकू म्हात्रे…’ या दमदार सीन आणि सिनेमाने मनोज बाजपेयीला स्टार बनवले. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन सौरभ शुक्ला आणि अनुराग कश्यप यांनी केले आहे. सुरुवातीला हा चित्रपट अॅक्शन फिल्म असणार होता, पण नंतर त्याचे रुपांतर अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपटात करण्यात आले. सत्याची सुरुवात एका अशा व्यक्तीच्या कथेपासून होते जो रोजगारासाठी मुंबईत येतो पण अंडरवर्ल्डच्या दुनियेत अडकतो. (Manoj Bajpayee on Satya Movie)
==================================
हे देखील वाचा: अभिनेता इम्रान हाश्मीची मोस्ट अवेटेड सिरीज Show Time चा ट्रेलर प्रदर्शित
==================================
चित्रपटातील जे.डी. चक्रवर्ती, उर्मिला मातोंडकर, सौरभ शुक्ला, आदित्य श्रीवास्तव आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत. मनोज बाजपेयीने 1994 मध्ये ‘द्रोहकाल‘ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, पण त्यात त्याला फक्त एका मिनिटासाठी स्क्रीन स्पेस मिळाली. यानंतर तो शेखर कपूरच्या ‘बँडिट क्वीन‘ या चित्रपटात झळकला, पण त्याचं खरं पदार्पण ‘सत्या‘ सिनेमा मानलं जातं. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची रांग लागली होती. भिखू म्हात्रे यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.