
Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड
भारतीय चित्रपटांमधून देशभक्तीची गोडी लावणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झालं. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाचा अभूतपूर्व ठेवा देऊन जाणाऱ्या मनोज कुमार यांना भारत म्हणून ओळखलं जात होतं. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. मनोज कुमार यांची गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली. तसेच, त्यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजे ५ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांचा मुलगा कुणाल गोस्वामी यांनी दिली आहे. (Entertainment trending news)

मनोज कुमार यांचा केवळ अभिनय नाही तर दिग्दर्शनात देखील हातखंडा होता. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘शोर’, ‘क्रांती’, ‘जय हिंद’ या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. मनोज कुमार म्हटलं की ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख येतोच. या चित्रपटात त्यांनी अभिनयासोबत दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली होती. मनोर कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपट अधिक केल्यामुळे ‘भारत कुमार’ या नावाने इंडस्ट्रीमध्ये त्यांची ओळख निर्माण झाली होती. (Bollywood update)

‘सहारा’, ‘हनीमून’, ‘पूरब और पश्चिम’, ‘मेरी आवाज सुनो’, ‘नसीब’, ‘नीलकमल’, ‘पत्थर के सनम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये मनोज कुमार यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना राष्टीय पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचा कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (Manoj Kumar movies)
============
हे देखील वाचा :मनोज कुमारमुळे बदललं प्रेम चोप्रा यांचं आयुष्य
============