
Manoj Kumar : पंतप्रधान इंदिरा गांधींशी थेट भिडलेले ‘भारत कुमार’!
हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं आज ४ एप्रिल २०२५ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं… ‘उपकार’, ‘रोटी, कपडा और मकान’, ‘क्रांती’ अशा अनेक चित्रपटांमधून आपली अभिनय शैली सादर करणाऱ्या मनोज कुमार यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातून केवळ मनोरंजन नव्हे तर देशभक्ती आणि सामाजिक उणिवा काय आहेत या देखील लोकांपर्यंत पोहोचवलं.. पण तुम्हाला माहित आहे का? आणीबाणीच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मनोज कुमार यांच्यात वाद निर्माण झाला होता.. काय होतं नेमंक कारण वाचा…(Entertainment news)
पंतप्रधान इंदिरा गांधीशी घेतलेला पंगा
मनोज कुमार यांच्या धाडसी वृत्तीचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी एक किस्सा इंदिरा गांधी 9Indira Gandhi) यांच्यासोबतच्या वादाचा आहे. मनोज कुमार आणि इंदिरा गांधी यांच्यात आणीबाणीच्या घोषणेनंतर वाद झाला होता. आणीबाणीची घोषणा होताच मनोज कुमार यांनी खुलेपणाने आणीबाणीचा विरोध केला होता. असं म्हटलं जातं की आणीबाणीला विरोध करणाऱ्या चित्रपट आणि कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती… त्यांचे चित्रपट प्रदर्शित होताच त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. अशीच बंदी मनोज कुमार यांच्या ‘दस नंबरी’ या चित्रपटासोबत घडलं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या चित्रपटावर बंदी घातली होती. त्यानंतर ‘शोर’ हा चित्रपटसुद्धा अशाच प्रकारच्या घटनेला सामोरं गेल्यानंतर प्रदर्शित झाला होता. ‘शोर’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक मनोज कुमार होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो दूरदर्शनवर दाखवण्यात आला होता, ज्यामुळे थिएटरमध्ये त्याची कमाई होऊ शकली नव्हती. यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. (Manoj Kumar)

मनोज कुमार यांच्यासमोर कोणताच पर्याय न राहिल्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली.. अनेक आठवडे त्यांनी कोर्टात पायपीट आणि अखेर याचा फायदा त्यांना झाला, कोर्टाने मनोज कुमार यांच्या बाजूने निकाल दिला. भारत सरकारविरोधात खटला जिंकणारे हे एकमेव कलाकार होते. या खटल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांना ‘आणीबाणी’वर चित्रपट बनवण्याची ऑफर दिली होती. परंतु मनोज कुमार यांनी ही ऑफर नाकारली होती. (Bollywood untold stories)
===========================
हे देखील वाचा: ‘डॉन’ चित्रपटाच्या निर्मिती मागे मनोज कुमार यांचे कनेक्शन
===========================
मनोज कुमार यांनी १९५७ मध्ये ‘फॅशन’ चित्रपटात छोटासा रोल केला.. त्यानंतर १९५८ मध्ये ‘सहारा’, १९५९ मध्ये ‘चांद’ अशा चित्रपटांमध्ये लहान-सहान भूमिका केल्यानंतर प्रमुख अभिनेता म्हणून १९६१ साली ‘काच की गुडिया’ या चित्रपटातून ते समोर आले आणि त्यानंतर त्यांनी कधी लिड रोल सोडलाच नाही… ‘अनिता’, ‘अमानत’’, ‘कलयुग और रामायण’, ‘दस नंबरी,’पंचायत’, ‘पिकनिक’, ‘पूरब और पश्चिम’, ‘वौ कौन थी’, ‘पेहचान’, ‘यादगार’, ‘नील कमल’, ‘गुमनाम’, ‘मा बेटा’ असे अनेक अजरामर चित्रपट त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले…(Manoj Kumar movies)