
अभिनेता Prasad Jawade याला मातृशोक
मराठी मनोरंजनसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे… अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या आईचं निधन झाल्याची बातमी जाती असतानाच आता आणखी एका अभिनेत्याच्या आईचं निधन झालं आहे… अभिनेता प्रसाद जवादे याच्या आईचं निधन झाल्याची बातमी समोर येत असून वयाच्या ६५व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली… बऱ्यच वर्षांपासून प्रसादची आई कर्करोगाशी झुंज देत होती आणि अखेर ती अपयशी ठरली. प्रसादच्या आईच्या निधनाची बातमी समजताच कलाविश्नातून दु:ख व्यक्त केलं जात आहे…
दरम्यान, प्रसादची पत्नी अमृता देशमुख हिने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रसादला मातृशोक झाल्याची माहिती दिली. तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “सौ प्रज्ञा जवादे ( प्रसाद जवादेची आई) 15 सप्टेंबर 1960 – 28 डिसेंबर 2025, वय 65 वर्षे… कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की, आज, 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी त्यांनी अपार धैर्य, आणि सकारात्मकतेने लढा दिला. त्या प्रेमळ, शांत आणि कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयात राहील. या पोस्टच्या खाली तिने आम्हाला तुमची खूप आठवण येईल मम्मी…”, तिच्या या पोस्टवर कलाकार आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे…

प्रसादचं त्याच्या आईशी खास नातं होतं… बऱ्याचदा सोशल मिडियावर तो आपल्या आईसोबतचे विशेष क्षण फोटो किंवा व्हिडिओंच्या माध्यमातून पोस्ट करताना दिसायचा… प्रसादला त्याच्या अभिनयाच्या संपू्र्ण प्रवासात आईची खंबीर साथ लाभली होती… त्यांनी झी मराठी पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या आईचे जाहिर आभारही मानले होते…
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात प्रसाद जवादेने त्याच्या आईला कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती सर्वांना दिली होती. यावेळी प्रसादला वाहिनीकडून ‘सर्वोत्कृष्ट मुलगा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी प्रसादचे कुटुंबीय त्याला सरप्राइज देण्यासाठी कार्यक्रमाला पोहोचले होते. आईला मंचावर आलेलं पाहताच प्रसादला अश्रू अनावर झाले होते. यादरम्यान त्याची पत्नी अमृता व प्रसादच्या सासूबाई सुद्धा उपस्थित होत्या.
याच कार्यक्रमात प्रसादच्या आई भावना व्यक्त करत म्हणाल्या होत्या, “कर्करोगाचं निदान झाल्यावर या कठीण प्रसंगात प्रसादने न खचता अगदी श्रावणाबाळासारखी माझी काळजी घेतली. रुग्णालयात सगळेजण त्याला श्रावणबाळ म्हणतात आणि खरोखरच तो आमच्यासाठी श्रावणबाळा.सारखा आहे. हा माझा आधुनिक काळातला श्रावणबाळ आहे. त्याला आज जे पारितोषिक मिळालंय ते तंतोतंत खरं आहे.”
================================
हे देखील वाचा : ‘Akshaye Khanna ट्रेंडिंग आहे म्हणून…’ किशोरी शहाणेंनी शेअर केला जुना व्हिडिओ
================================
सध्या प्रसाद झी मराठी वाहिनीवर ‘पारु’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतोय… याव्यतिरिक्त आधी प्रसाद ‘कन्यादान’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘कुलस्वामिनी’ अशा मालिकांमध्ये झळकला आहे… तसेच, ‘गुरु’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’, ‘मलंग’, ‘एक विलन रिटर्न्स’ अशा मराठी आणि हिंदी चित्रपटांतही तो झळकला आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi