Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

चला Mehboob Studio मध्ये…

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Swapnil Rajshekhar “आज आमचा सांता जाऊन…” अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची भावुक पोस्ट

 Swapnil Rajshekhar “आज आमचा सांता जाऊन…” अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची भावुक पोस्ट
टीव्ही वाले

Swapnil Rajshekhar “आज आमचा सांता जाऊन…” अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची भावुक पोस्ट

by Jyotsna Kulkarni 25/12/2024

आज मराठी मनोरंजनविश्वात अनेक असे कलाकार (Actor) आहेत, ज्यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या पूर्वजांकडूनच मिळाला आहे. असेच एक अभिनेते म्हणजे स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar). मराठी मनोरंजनविश्वात स्वप्नील यांनी मालिका, चित्रपट, नाटक अशा सर्वच माध्यमांमध्ये काम करत आपला ठसा उमटवला आहे. स्वप्नील हे मराठीमधील सुपरस्टार आणि दिग्गज दिवंगत अभिनेते राजशेखर (Rajshekhar) यांचे चिरंजीव आहेत. (Swapnil Rajshekhar)

अभिनेते राजशेखर यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आज त्यांचे चिरंजीव स्वप्नील राजशेखर देखील आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत अभिनयाचा वारसा जपत आहे.

आता स्वप्नील यांच्याबद्दल बोलायचे कारण म्हणजे स्वप्नील यांनी सोशल मीडिया वडिलांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त (Death Anniversary) एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ही पोस्ट सध्या कमालीची गाजत आहे. जाणून घेऊया स्वप्नील यांनी त्यामध्ये काय लिहिले आहे.

“आज एकोणीस वर्ष झाली आमचा सांता जाऊन…

काळ सरत राहिला, वर्ष उलटत राहीली.. आयुष्य पुढे सरकत राहिलं…सुखदुःख येत राहिली…२५ डिसेंबर २००५ च्या सकाळी पोटात आणि आयुष्यात पडलेला खड्डा आजही तसाच आहे..तो भरला नाही, भरणारही नाही कधी…

डोक्यावरचं आभाळ फाटलं, पाया खालची जमीन निसटली, पोकळी निर्माण झाली “ या आणि अशा पुस्तकी उपमा किती थिट्या आहेत हे क्षणोक्षणी जाणवावं असं फिलींग आहे आपला बाप या जगात नसण्याचं…

Swapnil Rajshekhar

गेली १९ वर्ष सतत एक विचार मन पोखरत रहातो की…पप्पा होते तेव्हा किती संधी होती माझ्याकडे त्यांना भरभरून भेटायची, बोलायची, त्याना स्वतःमधे साठवुन घेण्याची…
आणि किती निरर्थक, निरुपयोगी आणि भंगार गोष्टीत वेळ घालवला असेल मी पप्पा हयात असताना त्यांना वेळ न देता…

उद्या कधी टाईम ट्रॅव्हल शक्य झाला तर मी त्यांचं जाणं थांबवणार नाही कदाचीत, पण त्याआधीचा मॅक्सीमम काळ पप्पांच्या बरोबर घालवेन… त्यांचा स्पर्श आणखी आणखी साठवेन स्मृतीत…तो उबदार आश्वासक स्पर्श..

“मी आहे रे.. तु जिंकलास, हरलास, पडलास, चुकलास, माती खाल्लीस, रडलास,.. सगळ्यात मी आहे तुझ्याबरोबर” हे सांगणारा..पण च्यायला.. ही सगळी पश्चात बुध्दी आहे…
एरवी माणसाचं असणं गृहीतच धरतो आपण..

असो.. पप्पा तसे सोबत आहेत म्हणा..गरजेच्या वेळी डोळे मिटुन हात पुढे केला की त्यांचा स्पर्श हातात शब्दशः जाणवतो..सुदैवाने तेवढी पोतडी भरलेलीय आपली…बाकी तो चलता है.. दुनिया है..पण १९ वर्षात एक झालंय, कोणाचेही आईवडील गेल्याचं कळलं, की माझ्याही आतमधे तुटतं काहीतरी… त्याच्याबद्दल कणव दाटुन येते..

हल्लीच एका सुहृदाचे वडील गेले..मी ठरवुन बऱ्याच दिवसांनी भेटलो त्याला..बाकी काही बोलण्यासारखं नव्हतच..मी त्याच्या पाठीवर हात ठेवुन “welcome to the club” म्हणालो…
तो खोल बघत राहिला माझ्याकडे…”

View this post on Instagram

A post shared by Swapnil Rajshekhar (@meeswapnil)

स्वप्नील यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत राजशेखर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोबतच राजशेखर यांच्यावरील एक कलाकार म्हणून असलेले प्रेम देखील व्यक्त केले आहे. सध्या स्वप्नील यांची ही पोस्ट खूपच व्हायरल झाली आहे.

स्वप्नील राजशेखर यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. स्वप्नील हे उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते चांगले लेखक आणि दिग्दर्शक देखील आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actor swapnil rajshekhar remembering late father bollywood update Celebrity News Drama Entertainment marathi actor swapnil rajshekhar Marathi Movie Movie narathi swapnil rajshekhar post swapnil rajshekhar post for father TV अभिनेते स्वप्नील राजशेखर मराठी कलाकार स्वप्नील राजशेखर स्वप्नील राजशेखर स्वप्नील राजशेखर पोस्ट
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.