Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Umesh Bane ‘मराठी कलाकारांची अवस्था भिकाऱ्यासारखी’ प्रसिद्ध कलाकाराने पोस्ट शेअर करत सांगितली आपबिती

 Umesh Bane ‘मराठी कलाकारांची अवस्था भिकाऱ्यासारखी’ प्रसिद्ध कलाकाराने पोस्ट शेअर करत सांगितली आपबिती
टीव्ही वाले

Umesh Bane ‘मराठी कलाकारांची अवस्था भिकाऱ्यासारखी’ प्रसिद्ध कलाकाराने पोस्ट शेअर करत सांगितली आपबिती

by Jyotsna Kulkarni 18/01/2025

जे लोकं काम करतात त्यांना सगळ्यांनाच काम करताना काही ना काही समस्या येतात. प्रत्येकाचे आपल्या कामाच्या ठिकाणचे काही प्रॉब्लेम आणि टेन्शन असतात. आपल्याला असे वाटते कलाकारांचे बरे आहे त्यांना कसे टेन्शन नाही, प्रॉब्लेम नाही. भरपूर पैसा, नेम, फेम मात्र असे नाही. हे फक्त वर वर दिसण्यासाठी कलाकारांना देखील त्यांच्या कामाच्या बाबतीत अनेक त्रास असतात. फक्त याबद्दल जास्त बोलले जात नाही. (Marathi Entertainment News)

अनेकदा आपण कलाकारांच्या समस्यांबद्दल ऐकत असतो. कलाकारांना काम करताना होणारे त्रास, पेमेंट प्रॉब्लेम, कामाचे तास आदी अनेक गोष्टी कलाकारांसाठी डोकेदुखी असतात. याबद्दल बरेच कलाकार विविध मुलाखतींमध्ये बोलतात मात्र त्यावर तोडगा कधीच निघत नाही. आता पुन्हा एकदा हा विषय निघण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावरील पोस्ट. (Umesh Bane)

अभिनेते उमेश बने (Umesh Bane) महाराष्ट्रातील मालिका कलावंतांची बिकट स्थिती आणि त्यांच्या अवस्था ही राज्यातील भिकाऱ्यासारखी आहे, असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कलाकारांना कोणकोणत्या संकटाना सामोरे जावे लागत आहे, याबद्दल स्पष्ट्च लिहिले आहे. कलाकारांचे अनेक प्रॉब्लेम सध्या आहेत, त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे.

उमेश यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “माननीय मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस साहेब राज्यातल्या भिकाऱ्यासारखीच महाराष्ट्रातील मालिका कलावंतांची अवस्था आहे. तब्बल ९० दिवसानंतर मिळणारं पेमेंटही वेळेवर मिळत नाही. इन्कम टॅक्सच्या नावाखाली टीडीएस कट केला जातो, तो वेळेवर भरला जात नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रॉडक्शन हाऊस सोडली तर इतर ठिकाणी कलावंतांचे हालच, काही ठिकाणी खाण्याची व्यवस्था वाईट.

View this post on Instagram

A post shared by Umesh Bane Official (@umeshbane_official)

शिफ्टची वेळ ठरलेली असूनसुद्धा कोणताही अतिरिक्त मोबदला न घेता कलाकार रात्री उशिरापर्यंत शूटिंग करतो. तरी त्याला ९० दिवसांनी मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही. तुम्ही माहितीच्या आधाराखाली सगळ्या प्रॉडक्शन हाऊसचे अकाउंट चेक करा, सत्य समोर येईल. काही जणांच्या मानसिकतेच एवढं खच्चीकरण झालंय की, त्यांनी आत्महत्येच्या पोस्ट टाकल्या.

उद्या हा विषय पेट घेण्याआधी कृपया महाराष्ट्रातल्या, देशभरातल्या कलावंतांसाठी विधानसभेत आणि लोकसभेत हा विषय चर्चेला घ्या. कलाकारांना वेळेवर मानधन मिळालं पाहिजे त्यांच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे असा GR काढून तो चॅनल आणि निर्मात्यांना बंधनकारक करा,”

==============

हे देखील वाचा : Aadesh Bandekar : नाटकांपासून सुरु झालेला महाराष्ट्राच्या लाडक्या ‘भावोजींचा’ अभिनय प्रवास

==============

ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “कलाकार म्हणून मी माझी व्यथा मांडलीय जी सत्य आहे,तुम्ही दिग्दर्शक,तंत्रज्ञ कला क्षेत्रातले अजूनही कुणी अन्यायाने पीडित असाल,तर व्यक्त व्हा स्वतःची पोस्ट टाका, आपलं म्हणन, राज्यातल्या मुख्यमंत्र्यांन पर्यंत पोहचवा.” दरम्यान उमेश यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले असून त्यांनी काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. येऊ कशी कशी मी नांदायला आणि तुझेच मी गीत गात आहे या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Celebrity News cm devendrs fadnvis Entertainment Maharashtra marathi Marathi actor Umesh Bane marathi actors Marathi Movie tuzech mi geet gaat aahe fame Umesh Bane TV Umesh Bane Umesh Bane post अभिनेते उमेश बने उमेश बने उमेश बने पोस्ट उमेश बने बातम्या
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.