
Rupali Bhosle काळ्या साडीत खुलले रुपाली भोसलेचे सौंदर्य
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. या मालिकेतून रूपालीला अफाट लोकप्रियता मिळाली. नकारात्मक भूमिका असूनही रुपालीने तिचा चांगलाच नावलौकिक कमावला. (Rupali Bhosle)

काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र तरीही रुपालीची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. मालिका संपल्यानांतरही रुपाली सतत विविध कारणांमुळे चर्चेत येत असते. रुपाली सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून, ती सतत विविध पोस्ट करून प्रकाशझोतात येत असते.

नुकतेच रुपालीने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिने काळ्या रंगाची साडी नेसली असून, त्यावर साजेशी ज्वेलरी आणि मेकअप केलेला दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत असून, त्यावर तिच्या फॅन्सच्या भरभरून कमेंट्स देखील येत आहे.

रुपालीने आई कुठे काय करते या मालिकेत झळकण्यापूर्वी अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. मराठीसोबतच रुपालीने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

रुपाली मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वामध्ये देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ती सतत तिचे विविध वेषभूषेतले अनेक फोटो शेअर करत असते.
