अभिनेत्री साक्षी गांधीने अभिनेता रोहन गुजरच्या वाढदिवशी शेअर केली खास पोस्ट
‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेता रोहन गुजरने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. रोहनला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भरपूर शुभेच्छा मिळाल्या. रोहनला अनेक शुभेच्छा मिळालाय असल्या तरी सध्या त्याला शुभेच्छा देणाऱ्या एका व्यक्तीची आणि तिच्या पोस्ट कमालीची चर्चा होताना दिसत आहे.
‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री साक्षी गांधीने रोहनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर आणि लक्षवेधक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच साक्षीने रोहनसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहे.
साक्षीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “३३ वेळा लिहून erase करून finally ही पोस्ट करत आहे .. कारण honestly तुझ्याइतक उत्तम आम्हाला लिहिता येत नाही. Rohan Wishing you a Very Happy Birthday Boiiiiiii तू जे पात्र साकारतोस आणि जसं तू जगतोस , या दोन्ही गोष्टींचं नेहमी कौतुक वाटत आलय मला . इतकं साधं राहणं , साधं जगणं , चिकित्सक वृत्ती नाही , कशाचीही तक्रार नाही , कधी कुणाबद्दल वाईट वक्तव्य नाही . हे आणि यासारख्या असंख्य qualities या फार rare लोकांकडे असतात आणि त्यातला तू एक आहेस.
खर सांगायचं तर सुरुवातीला खूप दडपण यायचं तुझ्याबरोबर काम करताना . कारण मी लहानपणापासून तुझं काम पाहत आलेय. (याचा अर्थ तू लगेच वयाने मोठा होत नाहीस ) Rohan Gujar बरोबर screen शेयर करायची म्हणल्यावर थोडं tension , nervousness , आणि anxiety होतीच. पण मित्रा तू एक उत्तम co-actor आहेस . तुझे suggestions नेहमी पटण्याजोगे आणि योग्य असतात.
आणि त्याचा प्रत्यय वेळोवेळी मला आलेला आहे . Rohan तुझ्याशी कुठल्याही विषयावर बिनधास्त बोलता येऊ शकत , तुझ्याबरोबर कुठलाही problem आम्ही शेयर करू शकतो .कारण तू आम्हाला judge न करता उत्तम solution देणार याची खात्री असते . कधीही काहीही महत्वाचं ठरवायचं असेल , तर आधी रोहनशी बोलून बघूया हे आपसूकच सगळ्यांच्या तोंडून येत. तितका तू आमच्यासाठी Important आहेस.
आपले scenes जे चांगले होतात, असे बरेच जण म्हणतात . पण त्याचं क्रेडिट तुझं असतं . कारण तुझी energy मला पकडता येते . हे वाक्य असं घेऊन बघ . साक्षा जरा न चिडता बोल , ठेव ते स्क्रिप्ट , नको पाठ करू , लक्षात ठेव ग . etc etc…..रोहन तुझ्या या सगळ्या बोलण्याचा फक्त आणि फक्त फायदाच झालाय मला . Thanks for that तुला माहिती असेलच पण तरीही सांगते , तुझं आणि तुझ्या कामाचं खूप कौतुक होत असतं. साक्षी आग तुझा तो मित्र रोहन खूप चांगलं काम करतो ग .आपल्या मित्राबद्दलचं हे असं कौतुक , कसलं भारी वाटतं हे ऐकायला .
आपल्या सेट वरचे स्पॉट दादा त्यांचं काम जितकं मनापासून करतात , तसंच आपणही आपलं काम मनापासून आणि प्रामाणिक करायचं . आणि माणुसकी सोडायची नाही . आयुष्यभर हे मी लक्षात ठेवेन. “ गुरु रोहन गुजर “ तर… तू रोज काम करतोयस आणि तुझ्या आवडीचं काम तुला तुला आयुष्यभर करायला मिळतय एवढीच प्रार्थना बाकी सगळं मी बोलतच राहीन . आणि येस माझी बडबड कमी करेन . थोडी मोठी झाल्यासारखी वागेन. पण एका अटीवर … रोहन आपण ना ……. chinese खाऊ ……… Once again Happy Birthday”
दरम्यान रोहन गुजरने अनेक मालिकांमध्ये काम केले असून, त्याला होणार सून मी या घरची या मालिकेमुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. तर अभिनेत्री साक्षी गांधीला ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. सध्या साक्षी ‘नवी जन्मेन मी’मध्ये पाहायला मिळत आहे.