
Vishakha Subhedar : “रसिकांच्या प्रेमामुळे आयुष्यात…..” विशाखा सुभेदारची खास पोस्ट
नुकताच अभिनेत्री विशाखा सुभेदारनं (Vishakha Subhedar) तिचा वाढदिवस साजरा केला. तसं पाहिलं तर वाढदिवस हा लहान असो किंवा मोठे प्रत्येकासाठी खासच असतो. स्वतःचे सगळ्यांकडून कोडकौतुक करून घेण्याचा हक्काचा दिवस. त्यातही कलाकार मंडळींचा वाढदिवस म्हणजे अधिकच खास. कारण त्यांना तर त्या दिवशी चहुबाजूनी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत असतात. विशाखासाठी देखील तिचा हा वाढदिवस खूपच खास होता, मात्र तरीही तिने तिच्या आयुष्यातील दोन लोकांना या दिवशी सर्वात जास्त मिस केले.(Vishakha Subhedar)
विशाखाचा २२ मार्चला वाढदिवस होता. आपल्या विनोदाने संपूर्ण मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारी विशाखा सगळ्यांचीच आवडती अभिनेत्री आहे. केवळ विनोदीच नाही तर खलनायकी भूमिकांनीही सर्वांचेच मनं तिने जिंकले आहे. याच विशाखाने सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा वाढदिवस असलेला दिवस कसा साजरा केला, त्या दिवशी तिने काय केले? याबद्दल एक छानशी पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.(Vishakha Subhedar Post)

विशाखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “गेल्या अनेक वर्षात असा वाढदिवस झाला नाही. सुरुवात रात्री माझ्या लंडनला असणाऱ्या लेकानं केली. माझ्यासाठी केक पाठवला, मग रात्री तो आम्ही कापला आणि गप्पा मारत मारत त्यावर मी ताव मारला एकटीनंच. खरंतर खूप मिस करत होते मी माझ्या लेकाला. तो लांब आहे माझ्यापासून. आणि मग सकाळ झाली अनेक जणांचे फोन येत होते. दादा, वहिनी, भाचे, जावा, नंदा, दिर, माझ्या घरच्या अन्नपूर्णा, काहींचे फोन घेता आले, तर काही रिसिव्ह नाही करता आले.(Marathi Top Stories)
============
हे देखील वाचा : Jolly LLB 3 : अर्शद-अक्षयचा कोर्ट ड्रामा, जॉली एलएलबी ३’ची रिलीज डेट जाहिर
============
आणि मग सकाळी माझा नवरा आला. एक सोन्याचं ब्रेसलेट मला गिफ्ट केलं. मज्जाच वाटली मला, खूप जास्त. चक्क मला सरप्राईज दिलं त्यांनी. नाहीतर एरवी काय गिफ्ट घ्यायचं, काय नाही ते सगळं अगदी मला विचारून, मग त्यासाठी पैसे ठेवून, मग ते घेणार. पण ह्यावेळी माझ्या नवऱ्याने सिक्सरच मारला…आणि मग त्यानंतर आई घरी आली. तिच्या पाया पडले. औक्षण झालं. माझ्या बाबांचा बॉटल ग्रीन हा आवडता रंग, म्हणून मग त्यांच्या आवडीच्या रंगाचे कपडे घातले.(Marathi Latest News)
आणि मग निघाले दीनानाथच्या प्रयोगाला. प्रयोगाला सगळ्या नाटकाच्या मंडळींनी खूप छान स्वागत केलं. सगळ्यांनी विश केलं आणि छान प्रेक्षकांच्या सानिध्यात माझा वाढदिवस साजरा झाला. नाटक छान रंगलं. प्रेक्षक सुंदर दाद देत होते. अनेक लोकांनी खूप काय काय गिफ्ट आणले होते. खाण्याच्या गोष्टी… काही चॉकलेट, काही वड्या, मँगो बर्फी आणि सगळ्यात जास्त म्हणजे गजरे. मोगऱ्याचे गजरे आणि चाफा… इतका सुगंधी झाला माझा वाढदिवस काल…(Marathi Trending News)
आणि मग त्यानंतर माझी अतिशय जवळची मैत्रीण अर्चना तिचा नवरा म्हणजे मनजीत, पंढरीनाथ कांबळे, आद्या, ग्रीष्मा, अनिता कांबळे आणि आमचं पिल्लू अस्मि. तिथेच पुष्कर श्रोत्री, अमित राज, क्षितिज पटवर्धन ही मंडळी सुद्धा होती. ते सुद्धा विश करायला आले. गप्पा झाल्या…आम्ही हॉटेलमध्ये मस्त जेवणावर ताव मारला. माझ्या नवऱ्याचा सुद्धा नाटकाचा प्रयोग होता, म्हणून तो बिचारा येऊ शकला नाही. आणि माझा लेक लंडनला. त्या दोघांना मी खूप मिस केलं.(Vishakha Subhedar News)
ग्रीन house… पार्ले. खूपच चविष्ट जेवण होतं. इथे हॉटेलवाल्यांनी माझ्यासाठी केक अरेंज केला. स्वतः मालक, मालकीण, मुलं, त्यांच्या सुनबाई सगळे माझा वाढदिवस साजरा करायला, मला भेटायला आले. त्यांच्याबरोबर मग केक कापला. हॅपी बर्थडेचं गाणं लावलं त्यांनी हॉटेलमध्ये…आणि त्यांनी मला ट्रीट दिली. त्यांनी माझं बिलच माफ करून टाकलं. इतका सोन्यासारखा वाढदिवस काल झाला माझा, की क्या कहना…प्रेक्षकांच्या सानिध्यात, हशा आणि टाळ्यांच्या आवाजात, मित्र-मैत्रिणींच्या प्रेमात, खूपच कमाल दिवस गेला.(Social News)
============
हे देखील वाचा : Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?
============
आणि मला फेसबुकवर, इंस्टाग्रामवर ज्या ज्या मंडळींनी, ज्या ज्या रसिक प्रेक्षकांनी वाढदिवसाचं विश केलं, त्या सगळ्या मंडळींचे मनापासून आभार! आम्ही कलाकार खरंच खूप भाग्यवान असतो. आयुष्यभराचा आनंद रसिकांच्या प्रेमामुळे आमच्या आयुष्यात आलेला असतो. सगळ्यांचे पुन्हा मनापासून आभार! आणि सगळ्यात शेवटी ज्या परमेश्वराने मला हा दिवस दाखवला, त्या माझ्या देवाचे सुद्धा मनापासून आभार!”(Marathi Top Actress)
दरम्यान विशाखाबद्दल बोलायचे झाले तर ती मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी लीलया पेलणारी विशाखा ‘कॉमेडीची क्वीन’ म्हणून प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा, फु बाई फु आदी कॉमेडी शोमधून विशाखाने तिची ओळख तयार केली आहे.(top Marathi )