
Bollywood Movies 2025 : जुलै महिना चित्रपटांचा महाउत्सव; एकाच दिवशी रिलीज होणार ६ चित्रपट
२०२५ या वर्षांत प्रेक्षकांसाठी नवनवीन चित्रपट, सीरीजचा धमाका असणार आहे… २०२५ हे वर्ष अर्ध संपलं असून आता येत्या काळातही प्रेक्षकांना ऐतिहासिक, बायोपिक्स, क्राइम थ्रिलर, पौराणिक आणि काही सीक्वेल्सही भेटीला येणार आहेत… मात्र, येत्या १८ जुलैला प्रेक्षकांना चित्रपटगृहात १-२ नाही तर तब्बल ७ चित्रपट पाहता येणार आहेत.. एकाच दिवशी कोणते चित्रपट रिलीज होणार आहेत जाणून घेऊयात…
ये रे ये रे पैसा ३
संजय जाधव दिग्दर्शित ये रे ये रे पैसा ३ हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी रिलीज होणार आहे… यात तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर, वनिता खरात, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत…

सैयारा
अनन्या पांडे हिचा लहान भाऊ अहान पांडे लवकरच सैयारा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे… त्याचा हा चित्रप १८ जुलै रोजी रिलीज होणार असून त्याच्यासोबत चित्रपटात अनिता पद्डा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

तन्वी द ग्रेट
अनुपम खेर आणि पल्लवी जोशी यांची प्रमुख भूमिका असणारा तन्वी द ग्रेट हा चित्रपट १८ जुलैला रिलीज होणार आहे.. यात चित्रपटात ऑटिस्टिक असलेल्या तन्वीने तिच्या शहीद वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतल असून तिची प्रेरणादायी कहाणी यात दाखवली जाणार आहे… चित्रपटात शुभांगी दत्त,अनुपम खेर, इयान ग्लेन, बोमन इराणी, पल्लवी जोशी, अरविंद स्वामी, करण टकर जॅकी श्रॉफ असे बरेच कलाकार दिसमार आहेत…

मर्डरबाद
‘मर्डरबाद’ हा एक थरारक मर्डर मिस्ट्री चित्रपट असून यात जयपूरमधील एका राजवाड्यात पाहुणा बेपत्ता झाल्यानंतर काय घडतं हे दाखवलं गेलं आहे.. यात शारीब हाश्मी, अमोल गुप्ते, मनीष चौधरी, नकुल रोशन सहदेव कनिका कपूर यांच्या महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

संत तुकाराम
महाराष्ट्रातील थोर संत तुकाराम यांचं जीवन आता हिंदीत मोठ्या पडद्यावर दाखवलं जाणार आहे… यात मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने संत तुकाराम यांची भूमिका साकारली आहे… त्यामुळे देशभरात आता १८ जुलै रोजी संत तुकाराम यांचे विचार आणि त्यांचे अभंग चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचणार आहेत…

निकिता रॉय
‘निकिता रॉय’ हा एक क्राइम ड्रामा चित्रपट असून यात सोनाक्षी सिन्हा, अर्जुन रामपाल, परेश रावल आणि सुहेल नय्यर यांची प्रमुख भूमिका आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हा करत असून बऱ्याच काळानंतर सोनाक्षी देखील चित्रपटात दिसणार आहे…
