हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Ganpati Festival 2025 : मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा!
गणपती बाप्पा मोरया! सगळीकडे गणरायाच्या आगमनाने भक्तीमय वातावरण झालं आहे… बॉलिवूडपासून ते मराठी कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच घरी बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन केलं आहे… चला तर पाहूयात मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा!
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने तिच्या घरच्या बाप्पाचा खास फोटो शेअर केला आहे…

‘ठरलं तर मग’ मालिका फेम जुई गडकरी हिच्याही कर्जतच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

अभिनेत्री अमृता आणि अभिनेता प्रसाद यांनी देखील आपल्या घरी बाप्पा आणला असून भक्तीभावाने ते त्याची सेवा करत आहेत…

अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री सुभदा खांडकेकर यांच्या बाप्पाचा फोटो विशेष लक्षवेधी ठरला आहे… दरवर्षीप्रमाणे यंदाही कलेला समप्रित देखावा त्यांनी तयार केला आहे…

परदेशात जरी संसार करत असली तरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दरवर्षी गणेशोत्सवासाठी भारतात येते… तिने आणि तिच्या भावाने खास आपल्या हाताने बाप्पाची मुर्ती तयार केली असून तिने आई-वडील आणि भावासोबतही फोटो पोस्ट केले आहेत.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी देखील आपल्या घरी बाप्पाचं आगमन केलं आहे…

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने देखील तिच्या घरच्या गणरायाचा फोटो शेअर केला आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi