Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Vaibhav Mangale : “…तर मातृभाषेची भिकारणीची अवस्था होईल”; मराठी कलाकारांचा हिंदीला विरोध!

 Vaibhav Mangale : “…तर मातृभाषेची भिकारणीची अवस्था होईल”; मराठी कलाकारांचा हिंदीला विरोध!
मिक्स मसाला

Vaibhav Mangale : “…तर मातृभाषेची भिकारणीची अवस्था होईल”; मराठी कलाकारांचा हिंदीला विरोध!

by रसिका शिंदे-पॉल 27/06/2025

महाराष्ट्रात सध्या मराठी-हिंदी भाषेचा वाद चांगलाच तापलाय … राज्य सरकारने शाळेत त्रिभाषा धोरण जाहिर करत पहिलीपासूनच मुलांना शाळेत मराठी आणि इंग्रजी भाषेसोबत हिंदी भाषा देखील कंपलसरी केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय… आधीच मुलांवर अभ्यासाचा फार ताण असताना हिंदी भाषेची केलेली सक्त मराठी भाषेची गळचेपी होईल असं मत मराठी भाषाप्रेमींकडून केलं जातंय… सामान्य नागरिकांसोबतच मराठी कलाकारांनाही आता मराठी भाषेच्या अस्तित्वाची चिंता व्यक्त करत आपली मतं मांडलीयेत…(Marathi-Hindi Language Conflict In Maharashtra)

अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिलंय की, “उर्वरीत महाराष्ट्राचं मला माहीत नाही पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलीये. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलावं लागतं, हा एक भाग. दुसरं म्हणजे त्यांना आपापसातसुद्धा मराठी बोलायची लाज वाटते. आपली मुलं चांगलं मराठी बोलायचं विसरून गेलीयेत. त्यात आता राष्ट्रभाषेची सक्ती केली तर संपलंच सगळं.मातृभाषेची भिकारणीची अवस्था होईल”, अशा भाषेत त्यांनी संताप व्यक्त केलाय. पुढे त्यांनी असं देखील लिहिलंय की, “आता तर खेडोपाडी इंग्रजी शाळा झाल्या आहेत. मुंबई, पुणे येथे अनेक शाळांमध्ये मराठी शिकवलं जात नाही. मुलांशी घरात इंग्रजी बोला असं सांगितलं जातं. घरात आई-बाबाला धड इंग्रजी येत नाही. शाळेत शिक्षकांचं जे ऐकतील ते मुलं शिकतात. त्यामुळे धड इंग्रजी नाही, धड मराठी नाही, अशी अवस्था झालीये. यात अजून राष्ट्रभाषा जोडीला आणून बसवली तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा“, असं मत वैभव यांनी मांडलंय…(Marathi Entertainment News)

एकीकडे आपल्या मातृभाषेची आपल्याच माणसांना किंमत राहिली नाहीये असा आशय आपल्या मतांमधून वैभव यांनी मांडला असून दुसरीकडे अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांनी देखील इतक्या लहान वयात हिंदी भाषेच्या सक्तीची गरज काय आहे? असा प्रश्न थेट सरकारला विचारलाय… “आम्ही पण ५वी पासून हिंदी शिकलो आणि त्यामुळे फारसा काही फरक झाला नाही.. परदेशात गेलो तरी भाषेची फारशी अडचण आलीच नाही.. इतर कोणत्या भाषा बोलता आल्या नाहीत तरी आपली भाषा ही सुस्पष्ट बोलता येणं फार गरजेचं आहे…आणि त्यासाठी आपल्या घरात मुळात मराठी भाषा ही शुद्धपणे बोलली गेली पाहिजे.. कारण आपण भाषेला मोठं करत नाही तर भाषा आपल्याला मोठं करते”, असं मत अनासपुरेंनी व्यक्त केलंय…(Entertainment News)

तर, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मराठी चित्रपटांचं नाव मोठं करणारे अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी हिंदी भाषा सक्तीची करणं हे पुर्णपणे चुकीचं असून असंवेदनशील आहे असंही म्हटलंय…तसंच त्यांनी काहीही करा पण हे धोरण मागे घ्या. मुख्यमंत्री असो, भाषा शास्त्रातले असो किंवा ही सक्ती करणाऱ्या कमिटीतले असो त्यांना नम्र विनंती आहे की ही सक्ती करु नका. करायचीच तर पाचवी, सहावीनंतर करा अशी सयाजींनी विनंती केलीये….तर हेमंत ढोमे (Hemant Dhome) याने, “हिंदी ही व्यवहाराची भाषा असून आमच्या माथी मारु नका… महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे आणि येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा खांद्यावर खेळली पाहिजे त्यासाठी कष्ट करा”, असं स्पष्ट शब्दांत सरकारलाच सुनावलं आहे..(Marathi Celebrities)

================================

हे देखील वाचा: दादाची दादागिरी आता मोठ्या पडद्यावर; ‘हा’ कलाकार साकारणार Sourav Ganguly ची भूमिका

=================================

आपल्या देशात मराठी भाषेसह हिंदी, तमिळ, तेलुगु, गुजराती अशा वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोकं आहेत. हिंदी ही जरी राष्ट्रभाषा असली तरी आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे.. इतर कोणत्याही भाषेची महाराष्ट्रात सक्ती करण्यापेक्षा लाखो वर्षांचा इतिहास असणारी आपली मातृभाषा टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे… दरम्यान, काही मराठी कलाकारांनी हिंदी भाषा सक्तीबद्दल मतं मांडली असली तरी या मुद्द्यावर नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षितसह इतर मराठी कलाकार गप्प का आहेत असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केलाय… त्यामुळे आता सामान्यांसह, कलाकारांनीही हिंदी भाषेच्या सक्तीला केलेला विरोध सरकार मान्य करणार का? आणि हे त्रिभाषा धोरण रद्द करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment entertainment news in marathi Hemant Dhome hindi language conflict in maharashtra maharashtra news Makrand Anaspure marathi entertainment news Marathi Movie sanjay raut sayaji shinde vaibhav mangle
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.