Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Zee Marathi वाहिनीवरील ही मालिका होणार बंद?; अभिनेत्रीची पोस्ट झाली व्हायरल!
एकीकडे मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रेक्षकांची गर्दी वाढताना दिसतेय तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील मालिकांच्या कथांमध्ये तोचतोचपणा आल्यामुळे प्रेक्षक जरा नाराज झालेले दिसत आहेत… परिणामी टीआरपी घसरल्यामुळे काही मालिका बंद करुन त्याऐवजी नव्या मालिका सुरु केल्या जात आहेत… सध्या झी मराठी वाहिनीवरील काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता आहे… आता त्या मालिका नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊयात….(Marathi Entertainment News)

तर, मिळालेल्या माहितीनुसार, ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या ११ ऑगस्टपासून तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि शिवानी सोनार हिची प्रमुख भूमिका असलेली ‘तारिणी’ या दोन नव्याकोऱ्या मालिका सुरू होणार आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेची वेळ सायंकाळी ७:३० ची आहे, तर ‘तारिणी’ मालिका रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे… आता या दोन नवीन मालिका सुरू होणार म्हणजे त्यावेळी सुरु असणाऱ्या मालिका निरोप घेणार हे पक्क…

सध्या, रात्री ९.३० वाजता शिवा ही मालिका टेलिकास्ट होते… त्यामुळे आता त्यावेळी ‘तारिणी’ ही नवीन मालिका सुरु होणार याचा अर्थ ‘शिवा’ मालिका निरोप घेण्याची शक्यता आहे. याबद्दल अभिनेत्री पूर्वा कौशिकने मालिका बंद होणार असल्याची हिंट देखील इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत दिली होती. यावर चाहत्यांनी कमेंट करत “मालिका प्लीज बंद करू नका” अशी विनंती केली होती… यावर पूर्वाने सेटवरचा व्हिडीओ शेअर करत “हा आनंदी आवाज मी कायम मिस करेन” असं कॅप्शन दिलं असल्यामुळे मालिका लवकरच ऑफ एअर होईल असं स्पष्ट होतंय…(Marathi Daily Soaps)
================================
================================
यानंतर ‘झी मराठी’ वाहिनीवरून दुसरी मालिका जी ऑफ एअर होण्याची शक्यता वर्तवली जात होती ती म्हणजे ‘लाखात एक आमचा दादा’. सध्या ही मालिका ६:३० वाजता प्रसारित केली जात असून येत्या ११ ऑगस्टपासून या वेळेला ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. तर, ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका संपणार नसून मालिकेची वेळ आता सायंकाळी ६ वाजता करण्यात आली आहे… आता ‘तारिणी’ आणि ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या २ नव्या मालिका प्रेक्षकांना कशा वाटतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi