Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

RD Movie : थरारक ‘आरडी’चा दमदार ट्रेलर झाला रिलीज
नव्या दमाचे कलाकार आणि थरारक कथानक असलेल्या ‘आरडी’ (RD Movie) चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. तारुण्याच्या काळात आकर्षण आणि उत्साहाच्या भरात काहीवेळा हातून चूका घडतात. अशा एखाद्या चुकीबद्दल माफी न मागितल्यास पुढे त्याचे विचित्र परिणामही होऊ शकतात. अशाच ध्यानी मनी सुद्धा नसलेल्या विचित्र परिणामांची थरारक गोष्ट ‘आरडी’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. प्रेमकथा, अॅक्शन, गाणी असा पुरेपूर मसाला असलेला हा चित्रपट येत्या २१ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. (Marathi films)
‘आरडी’ या नावामुळेच आधीच उत्सुकता निर्माण केलेल्या या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखी वाढलं आहे. थरारक आणि रंजक या पलीकडे चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज बांधता येत नाही. रोमान्स, अॅक्शन, गाणी अशी मनोरंजनाची संपूर्ण मेजवानी या चित्रपटात आहे. (RD movie)

साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने ‘आरडी’ (RD Movie) चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे,विजयकांता दुबे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे. (Marathi Upcoming Film)