Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?
आजवर वेगवेगळया भाषांमधील चित्रपटांचे रिमेक्स झाले. काहींना त्या ग्रेट चित्रपटांना न्याय देता आला तरी काही जणं फसलेच. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतही हिंदी, साऊथ आणि हॉलिवूडच्या चित्रपटांचे रिमेक्स झाले आणि महत्वाचं म्हणजे मराठी मेकर्सना कमी बजेटमध्येही ते शिवधनुष्य पेलता आलं. आज आपण हॉलिवूडच्या उत्कृष्ट आयडियांना मराठी चित्रपटांनी करेक्ट न्याय देत कोणते चित्रपट तयार केले याची माहिती जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे हे चित्रपट हॉलीवुडमधून रिमेक केले आहेत असं वाटणारच नाही.

सगळ्यात पहिला आणि क्लासिक चित्रपट म्हणजे १९९३ चा ‘झपाटलेला’. हा चित्रपट हॉलिवूडच्या १९८८च्या हॉरर हिट ‘Child’s Play’ वरून प्रेरित आहे, ज्यात एका किलर डॉलची भयानक कहाणी आहे. मूळ चित्रपटात चकी नावाची डॉल आत्म्याने झपाटलेली असते. मराठीत दिग्दर्शक महेश कोठारे यांनी ही आयडिया घेऊन तात्या विंचू नावाच्या गँगस्टरचा आत्मा एका बाहुलीत प्रवेश करतो असं बनवलं. लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनय आणि व्हॉइसओवरने व महेश कोठारे यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने हा हॉरर कॉमेडी चित्रपट भरपूर गाजला. आजही अनेकांची तात्या विंचूचं नाव ऐकून घाबरायला होतंच.

या पुढचा चित्रपट आहे २००४ मध्ये आलेला ‘अगं बाई अरेच्चा!’. हा चित्रपट हॉलिवूडच्या २००० सालच्या सुपरहिट ‘What Women Want’ या चित्रपटावरून प्रेरित होऊन तयार केला गेला होता. मुळ चित्रपटात मेल गिब्सनने मुख्य भूमिका केली होती. चित्रपटातील मुळ नायकला अपघातानंतर स्त्रियांच्या मनातले विचार ऐकू येऊ लागतात. अगदी तसाच कॉन्सेप्ट घेऊन दिग्दर्शक केदार शिंदेंनी हा मराठी चित्रपट बनवला. संजय नार्वेकरने साकारलेलं श्रीरंग देशमुख हे पात्र म्हणजे निराश पुरुष, कुलदेवीच्या आशिर्वादाने स्त्रियांच्या मनातले ऐकू शकतो आणि मग त्याच्या आयुष्यात काय काय धमाल घडते, असं ऐकून कथानक होतं. मराठीतल्या या वेगळ्या प्रयोगामुळे तो हिट झालाच पण अजय-अतुल यांच्या संगीताने तो अजरामरच झाला.

तिसरा चित्रपट म्हणजे २००८ चा ‘दे धक्का’. हा चित्रपट थेट हॉलिवूडच्या २००६ च्या ऑस्कर-नॉमिनेटेड ‘Little Miss Sunshine’ या चित्रपटावरून प्रेरित आहे. मूळ चित्रपटात एक कुटुंब आपल्या मुलीला ब्यूटी पेजंटसाठी घेऊन रोड ट्रिपला निघते आणि रस्त्यात भरपूर धमाल-ड्रामा होतो. मराठीतही असाच प्रवास दाखवला आहे. जाधव कुटुंब आपल्या मुलीला डान्स कॉम्पिटिशनसाठी मुंबईला घेऊन जाते. शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्या अभिनयाने आणि ग्रामीण पार्श्वभूमीने हा चित्रपट अस्सल मराठी झाला. रस्त्यातल्या गाडीच्या बिघाडापासून ते कुटुंबाच्या भांडणांपर्यंत एक रोलर कोस्टर राइड असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं सुदेश मांजरेकर यांनी. आणि महत्वाचं म्हणजे हा चित्रपट सुद्धा इतका हीट झाला की त्याचे सीक्वेल्सही आले.

यानंतरचा चित्रपट म्हणजे २०१३ चा ‘मी आणि यू’. हा हॉलिवूडच्या २००५ सालच्या रोमँटिक कॉमेडी ‘Just Like Heaven’ वरून प्रेरित होत तयार केला गेला होता. ज्यात रीज विदरस्पून आणि मार्क रफालो होते. त्या चित्रपटात एका मुलीची आत्मा तिच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मुलाला दिसू लागते. मराठीतही असाच टच देण्यात आला आहे. भूषण प्रधान आणि सई लोकूर यांच्या लव स्टोरीत फेसबुकपासून सुरू होणारी गोष्ट एका वेगळ्या वळणावर जाते. दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी मराठी प्रेक्षकांसाठी स्टोरी ट्विस्ट करून ती तरुणाईला आवडेल अशी बनवली होती.
================================
हे देखील वाचा : इंग्रजांनाही आकर्षित करणारी झाडीपट्टी रंगभूमी!
================================
आता शेवटचा चित्रपट आहे २०१४ चा ‘हॅपी जर्नी’. हा हॉलिवूडच्या १९९३ च्या ‘Benny & Joon’ या चित्रपटावरून प्रेरित आहे, ज्यात जॉनी डेपने एका मेंटली चॅलेंज्ड मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या विचित्र मुलाची भूमिका केली होती. मराठीत सचिन कुंडलकर यांनी भाऊ-बहिणीच्या नात्यावर फोकस करून ही कथा सांगितली होती. अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट यांच्या अभिनयाने हा चित्रपट भावनिक आणि हृदयस्पर्शी झाला होता. बहिणीच्या निधनानंतर भाऊला तिचा आत्मा दिसतो आणि त्याला आयुष्याची नवीन दिशा मिळते. त्यामुळे मराठीत ग्रेट आणि ओरिजनल कंटेन्ट आहेतच, परंतु, इतर भाषिक चित्रपटांपासून प्रेरित होत मेकर्स उत्कृष्ट चित्रपट तयार करतात यातही शंका नाही.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi