Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Parineeti Chopra-Raghav Chadha यांनी शेअर केला मुलाचा पहिला फोटो; नाव

१३,३३३ वा प्रयोग, आपत्तीग्रस्तांना १३ लाख ३३३ रुपयांची मदत; Prashant

गोष्ट Asha Parekh ने शशी कपूरला मारलेल्या करकचून मिठीची!

चित्रपती V.Shantaram यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Marathi in Hollywood : हॉलीवूडमधला मराठी तडका!

 Marathi in Hollywood : हॉलीवूडमधला मराठी तडका!
कलाकृती विशेष

Marathi in Hollywood : हॉलीवूडमधला मराठी तडका!

by रसिका शिंदे-पॉल 27/06/2025

आपण हॉलीवूडबद्दल बोलतो, तेव्हा डोळ्यांसमोर येतात Mission Impossible स्टंट्स, Fast & Furious च्या कार्स, Avatar चं जबरदस्त VFX, आणि Marvel चे धडाकेबाज व्हिज्युअल्स ! परंतु हॉलीवूड म्हणजे फक्त Spider-Man, Iron Man आणि Thor नाही मित्रांनो… तिथे सुद्धा आपला मराठी बाणा जपला गेला आहे. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये मराठीचा झेंडा रोवला गेलाय… विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे… आज आपण अशाच भन्नाट गोष्टी पाहणार आहोत ज्यांनी Hollywood मध्ये थेट मराठी रंगत आणलीये . चला तर जाणून घेऊया हॉलीवूडमध्ये नेमकं काय मराठी आहे ते.…(Marathi In Hollywood Films)

आपल्यापैकी असा कोणी नक्कीच नसेल जो Harry Potter चा फॅन नसेल. Harry Potter म्हटलं की नॉस्टॅल्जिया आपोआप येतो ! मग ते हॉगवर्ट्सचं स्कूल असो, डंबलडोर असो, hagrid, dobby, Woldermot, hermoiney किंवा ‘विंगार्डियम लेव्हीओसा’ म्हणत जादू करण असो ! पण तुम्हाला माहितेय का, या जादूच्या दुनियेत सुद्धा आपल्या मराठमोळ्या जुळ्या बहिणी झळकल्या होत्या. आणि त्यांची नावं आहे पद्मा पाटील आणि पार्वती पाटील… काहितरी नवीन ऐकल्यासारखं वाटत असेल ना… हो… Hogwarts School मध्ये शिकणाऱ्या या दोन जुळ्या बहिणी भारतीय आणि खास महाराष्ट्राच्या दाखवण्यात आल्या आहेत. तसं पाटलांनी जग गाजवलं आहे. त्यात या दोन्ही पाटील बहिणींनी तर Harry Potter सुद्धा गाजवलं होतं. यामध्ये Padma पाटीलचा रोल केला होता, अफशान आझादने तर Parvati patil चा रोल शेफाली चौधरीने केला होता… पाटील जोमात…बाकीचे कोमात !

पण आपली मराठी बाणा इथवर थांबला नाही… आणखी एका ब्लॉकबस्टर हॉलीवूड सिनेमात मराठी पात्र दिसून आलं, तो म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता Pirates of the Caribbean आणि यामध्ये अभिनेता जॉनी डेपने साकारलेली Jack Sparrow ची क्रेझ सगळ्यांनाच माहितीय. या मूव्हीचा तिसरा पार्ट Pirates of the Caribbean: At World’s End मध्ये एक सिन आहे की, जगभरातल्या सगळ्या समुद्री पायरेट Lords ची बैठक भरते, आणि तिथे एक खलाशी लीडर हे Indian Ocean च्या समुद्राचे किंग दाखवलेले आहेत… ज्यांचं नाव आहे श्री संभाजी आंग्रे ! हो, लागला ना शॉक ? आता संभाजी आंग्रे हे मराठ्यांच्या इतिहासाशी मिळतं जुळतं नाव वाटतय. तर हे संभाजी आंग्रे म्हणजे मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र… त्यांनी भारतीय समुद्रात असा दरारा निर्माण केला की इंग्रज, डच, पोर्तुगीज सगळे त्यांच्यासमोर झुकले. त्यातच पोर्तुगीजांपासून इंग्रजांनीही त्यांच्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे. त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे या पायरेट्सच्या तिसऱ्या भागात दाखवण्यात आले आहेत. त्यांचा रोल या सिनेमात साकारला होता Marshall Manesh यांनी…(Hollywood movies)

याशिवाय २६/११ वर आतापर्यंत बरेच movies आले… पण Hotel Mumbai हा हॉलीवूड movie काहीतरी खास होता ! ज्यात देव पटेलचा लीड रोल होता. आता विषय मुंबई म्हणजे मराठी माणूस त्यात आलाच पाहिजे ना… या सिनेमात आपले मराठमोळे अभिनेते नागेश भोसलेसुद्धा झळकले होते ! यामध्ये त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरचा रोल केला होता. यातली एक खास गोष्ट म्हणजे, यामध्ये थेट मराठी संवाद आहे… म्हणजे एका हॉलीवूड चित्रपट एका संवादासाठी पूर्णपणे मराठी भाषाच वापरण्यात आली आहे, अर्थात हा एक वेगळाच आनंद…! आणखी एक क्लास सिनेमा म्हणजे Lion… याची स्टोरी अशी की, एक लहान गरीब आपल्या कुटुंबापासून वेगळा होतो, हरवतो, नंतर त्याला एक अनाथालय ठेऊन घेतात. मग एक ऑस्ट्रेलियन कपल तिथे येत आणि त्याला घेऊन ऑस्ट्रेलियाला जातात… आणि मोठेपणी आपल्या आईचा शोध घेत तो पुन्हा भारतात येतो ! आणि अशा या लहान मुलाची भूमिका केली आपल्या मराठमोळ्या सनी पवार या चिमुकल्यान… आणि त्याच्या भावाची भूमिका केली अभिषेक भराटे याने… या मुव्हीला ६ Oscar नॉमिनेशन मिळाले होते तर २ बाफ्टा award मिळाले.(Entertainment News)

मूळातच ऑस्करचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर Hollywood च चमकतो… पण तुम्हाला माहितीय का? पहिला ऑस्कर जिंकणाऱ्या भारतीय कलाकार यासुद्धा मराठी होत्या. त्यांचं नाव भानू अथैय्या… मूळ नाव भानू राजोपाध्ये आणि त्या कोल्हापूरच्या… भानू यांना गांधी या चित्रपटासाठी बेस्ट कॉस्च्युम डिझाईनचं ऑस्कर मिळाला होता. या शिवाय याच गांधी movie मध्ये कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांनी BAFTA अवॉर्ड सुद्धा पटकावलाय ! आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. यामध्ये आपले दोन मराठी दिग्गज श्रीराम लागू आणि मोहन आघाशे यांनीही महत्त्वपूर्ण भुमिका केली होती.

================================

हे देखील वाचा: Sridevi यांनी नकार दिलेल्या ‘या’ चित्रपटामुळे माधुरीला मिळाला धकधक गर्लचा टॅग!

=================================

चित्रपटासोबत म्युझिकच्या बाबतीतही आपली मराठी मागे नाही. ज्या गाण्यांनी अख्या महाराष्ट्राला वेड लावलं अश्या सैराटचं म्युझिक थेट हॉलीवूडच्या Sony Scoring Stage वर रेकॉर्ड झालं ! हॉलीवूडमध्ये रेकॉर्ड होणारा हा पहिलाच इंडियन मुव्ही ! याव्यतिरिक्त ‘मोगलमर्दिनी ताराराणी’ सोनाली कुलकर्णीचा movie जो Hollywood स्टुडिओसोबत कोलॅब करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला ! त्यामुळे ह्या सगळ्यात सांगायचं एवढंच… की मराठीचं नाणं फक्त देशात नाही, तर हॉलीवूडमध्येही वाजतंय आणि गाजतंय सुद्धा ! मराठी टॅलेंट… थेट हॉलीवूडपर्यंत पोहोचलेलं आहे… जे प्रत्येक मराठी माणसांसाठी, कलाकारांसाठी असलेला अभिमानाचा क्षण आहे. (Latest Entertainment News)

-सागर जाधव

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment Featured harry potter Hollywood Movies marathi movies mission impossible
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.