Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

५६ वर्षांत मराठी चित्रपटाची IFFI मध्ये बाजी; पदार्पणातच गोंधळच्या दिग्दर्शकाला मिळाला ‘हा’ पुरस्कार
मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ताकद दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. गोव्यात झालेल्या ५६व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये ‘गोंधळ’ने ‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या ५६ वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय अधिकच ऐतिहासिक ठरला आहे.

यंदा ‘इफ्फी’मध्ये ११३० चित्रपटांची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील ५७० फिचर फिल्म्स होत्या. त्या चित्रपटांमधून हा ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका’चा अवॉर्ड ‘गोंधळ’ला मिळाला असून पंधरा लाख रुपये रोख आणि मानांकन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१९ ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाच्या लिजो जोस यांना ‘सिल्व्हर पिकॅाक सेक्शन’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका’साठी अवॅार्ड मिळाला होता. त्यानंतर कोणत्याही भारतीय चित्रपटाला ‘सिल्व्हर पिकॅाक सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला नव्हता. यंदा हा अवॅार्ड भारताला मिळाला असून ५६ वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हा अवॅार्ड मिळाल्याने मराठी सिनेसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात अवॅार्ड मिळालेला ‘गोंधळ’ हा एकमेव चित्रपट आहे. संतोष डावखर यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असतानाही त्यांना थेट ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका’चा अवॅार्ड मिळाला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा, लोकपरंपरा आणि मानवी भावना यांचं प्रभावी चित्रण करतो. नवरा–नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या ‘गोंधळ’ या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहाणारी कथा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहाता अंधश्रद्धा, कुटुंबातील नात्यांचे संघर्ष, समाजात बदलणारे दृष्टिकोन आणि माणसांच्या मनात दडलेला रहस्याचा धागा यांचाही वेध घेते.
================================
हे देखील वाचा : Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील; कारण…
================================
‘गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन संतोष डावखर यांनीच केले असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके या भक्कम कलाकारांची फळी या चित्रपटात आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi