Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा गौरव!

 Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा गौरव!
मिक्स मसाला

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा गौरव!

by रसिका शिंदे-पॉल 09/02/2026

मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोकपरंपरेची ताकद आणि आधुनिक विचारांची प्रभावी सांगड घालणारा ‘गोंधळ’ हा मराठी चित्रपट सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा इतिहास घडवत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) कडून ‘गोंधळ’ला मिळालेला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा मराठी सिनेसृष्टीसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरत आहे.

फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) ही जगभरातील आघाडीच्या चित्रपट समीक्षकांची स्वतंत्र आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संघटना आहे. कान्स, व्हेनिस, बर्लिन, टोरांटो यांसारख्या जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सवांमध्ये ही संघटना अधिकृत ज्युरीपासून स्वतंत्रपणे चित्रपटांचे मूल्यमापन करून पुरस्कार प्रदान करते. कलात्मक गुणवत्ता, सांस्कृतिक आशय, सामाजिक आशयघनता, दिग्दर्शनातील धाडस आणि नावीन्यपूर्ण मांडणी यांना प्राधान्य देणारा हा पुरस्कार ‘समीक्षकांची सर्वोच्च दाद’ म्हणून मानला जातो. सध्या या संघटनेचे नेतृत्व इजिप्शियन फिल्म क्रिटिक अहमद शॉकी करत असून, सांस्कृतिकदृष्ट्या खोलवर रुजलेले आणि धाडसी सिनेमॅटिक प्रयोग करणाऱ्या चित्रपटांवर फिप्रेस्को विशेष प्रकाशझोत टाकते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘गोंधळ’ने याआधीही अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये आपली ठसकेबाज छाप उमटवली आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच २२व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२६मध्येही या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

याचबरोबर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पिकॉक’ अवॉर्ड मिळवत ‘गोंधळ’ने राष्ट्रीय पातळीवरही मोठी दखल मिळवली. एकाच चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मान्यता मराठी चित्रपटसृष्टीसाठी खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरत आहे.

================================

हे देखील वाचा : Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील; कारण…

================================

‘गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे यांच्यासह अनेक अनुभवी कलाकारांनी या चित्रपटाला दमदार अभिनयाची ताकद दिली आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update Entertainment gondhal movie Kishore Kadam
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.