
Gondhal ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास
महाराष्ट्राच्या लोककलांवर आणि प्रथांवर आधारित चित्रपट मराठीत येताना दिसत आहेत… यात ‘दशावतार’ आणि ‘गोंधळ’ यांचा समावेश होतो… लग्न झाल्यानंतर नव्या दाम्पत्यासाठी गोंधळ घातला जातो… आणि याच प्रथेवर आधारित गोंधळ हा मराठी चित्रपट आला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या कलाकृतीला मिळत आहे… (Marathi Movies 2025)
दमदार कथानक, भव्य स्केल आणि उत्कट अभिनयाच्या बळावर हा चित्रपट आधीच चर्चेत होता, मात्र आता या चित्रपटाचे आणखी एक भव्य वैशिष्ट्य समोर आले आहे. ‘गोंधळ’च्या पहिल्या हाफमध्ये तब्बल २५ मिनिटांचा वनटेक सीन घेण्यात आला असून हे भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच घडले आहे. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड करण्यासाठी संपूर्ण टीमने सात दिवसांत हा भव्य टेक परिपूर्ण झाला.

भारतीय चित्रपटांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या अचूक प्लॅनिंगने झालेला वनटेक हा पहिला प्रयोग ठरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही वन-टेक शैलीला विशेष मान्यता मिळालेली आहे. २०१४ मधील ‘बर्डमॅन’ आणि २०१९ मधील ‘१९१७’ या चित्रपटांनी याच शैलीचा प्रभावी वापर करून ऑस्कर जिंकला असून ‘गोंधळ’चा हा प्रयोग त्याच दर्जाच्या धाडसाच्या पावलावर पाऊल टाकणारा आहे. (Entertainment News in Marathi)
‘गोंधळ’ हा चित्रपट महाराष्ट्राची परंपरा, मानवी भावभावनांच्या गुंतागुंतीवर, नात्यांच्या ताणतणावांवर आणि परिस्थितींच्या रोलर-कोस्टरवर आधारित चित्रपट आहे. नाट्य आणि थराराचा अनोखा संगम, शक्तिशाली पात्रं आणि त्यांच्या मनातील असंख्य परताव्यांना पडद्यावर उतरवणारी ही कथा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे.
================================
हे देखील वाचा : Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील; कारण…
================================
वनटेक हा प्रकार लहान-मोठ्या सीनमध्ये अनेक चित्रपटांनी आजवर वापरला असला, तरी २५ मिनिटांचा अखंड, अविरत वनटेक भारतात पहिल्यांदाच ‘गोंधळ’च्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटाने केलेला हा प्रयोग केवळ तांत्रिक विजय नाही तर प्रेक्षकांना दिलेला अनोखा अनुभवही आहे.

संतोष डावखर दिग्दर्शित या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi