Vidya Balan नाही तर ‘या’ अभिनेत्री असत्या ‘परिणीता’मधील लोलिता!

Marathi Movie 2025 : रुपेरी पडद्यावर झळकणार ‘जब्राट’
मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट येत आहेत… अशातच मैत्रीवर आधारित एख नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे…आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक नवनवीन मित्रमैत्रिणी भेटतात. यात काही जण आजन्म आपल्यासोबतची मैत्री टिकवून ठेवतात…. मैत्री अखेरपर्यंत निभावणं प्रत्येकाला जमत नाही… आपल्या मैत्रीला जागणाऱ्या मित्रांची कथा सांगणारा तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ हा नवीन मराठी चित्रपट नववर्षारंभी रुपेरी पडद्यावर येणार आहे…. (Marathi Movies)

‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. नृत्यदिग्दर्शन आशिष पाटीलने केलं असून लोकगीतांनी नटलेल्या या चित्रपटात बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमाप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : “वरण-भात माझं आवडीचं जेवण”, ट्रोल झाल्यावर Vivek Agnihotri यांची पलटी
=================================
‘लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला असणाऱ्या ‘जब्राट’ या संगीतमय चित्रपटात आयुष संजीव, अनुष्का सरकटे, वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट, प्रगती कोळगे या तरुण फळीसोबत संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, गणेश यादव ही ज्येष्ठ कलाकार मंडळीही यात दिसणार आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi