Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Hema Malini to Rekha : बॉलिवूडच्या ‘या’ स्टार्सना सरकारही देतंय

Manoj Bajapayee : चिन्मय मांडलेकरचा ‘इन्सपेक्टर झेंडे’ लवकरच रिलीज होणार

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं

अभिनेत्री Salma Agha हिला ‘निकाह’ मधील गाणी गायची संधी कशी

Kajol पुन्हा कोर्टात उभी राहणार; ‘द ट्रायल’ सीझन २ ची

Khalid Ka Shivaji चित्रपटाला इतका विरोध का होतोय?

Suresh Wadkar यांनी माधुरी दीक्षितचं लग्नाचं स्थळ नाकारलं होतं?

आधी फ्लॉप नंतर ब्लॉकबस्टर Sholay बद्दल असं का झालं?

Karishma Kapoor : संजय कपूरची ३० हजार कोटींची प्रोपर्टी कुणाला

Abhanga Repost: गणेशोत्सवानिमित्त ‘अभंग रिपोस्ट’ ची मैफल आता टीव्हीवरही अनुभवता येणार; पाहा कुठे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

चक्क मोबाईलवर चित्रित झाला ‘पाँडीचेरी’ हा मराठी चित्रपट .. ‘हे’ होतं त्यामागचं कारण

 चक्क मोबाईलवर चित्रित झाला ‘पाँडीचेरी’ हा मराठी चित्रपट .. ‘हे’ होतं त्यामागचं कारण
कलाकृती विशेष

चक्क मोबाईलवर चित्रित झाला ‘पाँडीचेरी’ हा मराठी चित्रपट .. ‘हे’ होतं त्यामागचं कारण

by Team KalakrutiMedia 14/02/2022

अथांग समृद्र, निसर्गसौंदर्य, फ्रेंच धाटणीची रंगीबेरंगी घरं. कोणत्याही पर्यटकाला भुरळ पडेल अशा या पाँडीचेरी शहराची सफर आता आपल्याला ‘पाँडीचेरी’ नावाच्याच एका मराठी चित्रपटात करता येणार आहे. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, वैभव तत्त्ववादी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला आहे. 

‘पाँडीचेरी’ या चित्रपटात महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. ‘गुलाबजाम’ सारखा सुपरहीट चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी ‘पाँडीचेरी’चं दिग्दर्शन केलंय. दिग्दर्शनासोबतच त्यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मितीही केली आहे.

या सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाचं शूटिंग चक्क मोबाईवर करण्यात आलंय. आणि यामागचं कारण म्हणजे काहीतरी नवीन करण्याचा अट्टाहास! ‘पाँडीचेरी’बद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”प्लॅनेट मराठी जगातील पहिले मराठी ओटीटी असून, त्यावर पहिली थिएटर फिल्म ‘जून’ झळकली होती. आम्ही नेहमीच नवनवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असतो. असाच वेगळा प्रयोग ‘पाँडीचेरी’मध्येही करण्यात आला आहे.  हा चित्रपट स्मार्ट फोनवर चित्रीत झाला आहे. अशा पध्दतीची ही पहिली ‘फिचर फिल्म’ आहे.

अत्यंत मोजक्या टीममध्ये केवळ एक महिन्यात एका उत्तम चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणेज ‘पाँडीचेरी’. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. असाच एक वेगळा विषय, कथा आपल्याला ‘पाँडीचेरी’ मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अनेक जमेच्या बाजू आहेत. दिग्दर्शक, कथा, कलाकार आणि नैसर्गिक सौंदर्याने खुललेले नयनरम्य ‘पाँडीचेरी’. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

पाँडीचेरी सारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची आगळीवेगळी गोष्ट सांगणारा, नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणारा हा चित्रपट असून विस्थापित झालेले लोक कोणत्या पध्दतीची नाती निर्माण करतात, यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. एकंदरच नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात सई, वैभव आणि अमृता यांच्या नात्याचा नवीन प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

====

हे देखील वाचा: सई… एक परिपूर्ण अभिनेत्री!!!

====

टिझरवरून हा चित्रपट ‘लव्ह ट्रँगल’ वाटत असला, तरी हा या चित्रपटाचा विषय नाहीये. हा एक भावनिक प्रवास असून या तिघांच्या नात्याचा शेवट कुठे होतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा संपूर्ण चित्रपट मोबाईलवर चित्रित करण्यात आल्याने साहजिकच यात भरपूर मोठा तांत्रिक फरक आहे. कुठेही त्याचा समतोल बिघडू नये, यासाठी काळजीपूर्वक चित्रीकरण करण्यात आले आहे. यात छायाचित्रणकार मिलिंद जोग यांचेही कसब दिसते. 

====

हे देखील वाचा: अमृता खानविलकर…. हिंदीचं ग्लॅमर, मराठी ठसका

====

या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक अष्टपैलू कलाकार एकत्र आले आहेत. ही अनोखी भावनिक कथा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.” असा विश्वास चित्रपटाच्या टीमला आहे. .

– वेदश्री ताम्हणे

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Celebrity News Entertainment Marathi Actor Marathi Movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.