Madhubala : रोमँटिक ड्यूएट गाण्याची चाल चक्क अंधेरीच्या रेल्वे स्टेशनवर

Ganpati Festival 2025 : गणेशोत्सवात घरबसल्या नक्की पाहा बाप्पाचे हे चित्रपट
सर्वत्र सध्या मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे… गणपती बाप्पाच्या आगमनाने सारी दु:ख दुर ठेवून लोकं बाप्पाच्या सेवेसाठी रुजु झालेत… तसेच, चारमानी कोकणाकडे रवाना झाले आहेत… वर्षभर सर्वजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण आला असून पुढचे ११ दिवस भाविक गणपतीच्या भक्तीत तल्लीन होणार आहेत.. आता अशात तुम्ही घरबसल्या बाप्पाची सेवा करत गणपतीवर आधारित हे चित्रपट नक्की पाहू शकता… (Ganeshotsav 2025)

अष्टविनायक
“अष्टविनायका तुझा महिमा कसा…”, “प्रथम तुला वंदितो” ही मन प्रसन्न करणारी गाणी आजही लोकप्रिय आहे. ‘अष्टविनायक’ सिनेमाप्रमाणेच ही गाणंही प्रचंड हिट झाली. १९७९ साली ‘अष्टविनायक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात मराठी अभिनेते सचिन पिळगावकर मुख्य भूमिकेत झळकले होते.

मोरया
अवधुत गुप्ते दिग्दर्शित २०११ साली आलेल्या मोरया चित्रपटाचं कथानक मंडळातील गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, कशी मंडळांमध्ये चढाओढ असते, कसं राजकारण खेळलं जातं यावर आधारित होतं… चित्रपटात संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, स्पृहा जोशी, दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या…

लोकमान्य: एक युगपुरुष
स्रावजनिक गणेशोत्सवाचा ज्यांनी पाया रचला त्या लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘लोकमान्य: एक युगपुरुष’ हा २०१५ मध्ये रिलीज झाला होता… यात गणेशोत्सवाचं प्राथमिक रुप कसं होतं, लोकांना उपदेश विविध कार्यक्रमांमधून कसे दिले जात होते याची मांडणी करण्यात आली होती… या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेले ‘गजानना गजानना’ गाणे खूप प्रसिद्ध झाले असून चित्रपटात सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका होती…

लालबागचा राजा
विजय खानविलकर दिग्दर्शित लालबागचा राजा हा चित्रपट २००६ मध्ये रिलीज झाला होता… या चित्रपटात सुनील बर्वे, सुबोध भावे, प्रेमा किरण, उशा नाईक यांच्या प्रमुख भूमिका होत्या…

नवरा माझा नवसाचा
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित आणि अभिनित नवरा माझा नवसाचा हा चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला होता.. या चित्रपटाचं कथानक गणपतीपुळे गणपतीच्या चरणी अपूर्ण राहिलेला नवस फेडण्यासाठी बायको काय काय खटाटोप करते यावर आधारित आहे… दरम्यान, या चित्रपटाचा दुसरा भाग नवरा माझा नवसाचा २ प्रेक्षकांसाठी २०२४ मध्ये रिलीझ झाला होता…

घरत गणपती
२०२४ मध्ये रिलीज झालेला ‘घरत गणपती’ चित्रपट कोकणात गणेशोत्सव प्रत्येक घरात कसा साजरा केला जातो याचं प्रत्यक्ष दर्शन घडवून देणारा होता… भूषण प्रधान, अश्विनी भावे, संजय मोने,निकिता दत्ता यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘घरत गणपती’ चित्रपट २९ ऑगस्टपासून महाराष्ट्रातील थिएटर्समध्ये री-रिलीज करण्यात येणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi