ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
मराठमोळ्या तनुजाने पंजाबचा पुत्तर धर्मेंद्रला शिकवला धडा
हिंदी सिनेमाच्या इतिहासात आपण जेव्हा डोकावतो तेव्हा अनेक मनोरंजक गोष्टी आपल्याला पुन्हा पाहायला मिळतात. जेव्हा आपण जुनी नियतकालिके, जुने चित्रपट, जुने वर्तमानपत्र वाचतो तेव्हा अनेक संदर्भ आपल्याला सापडतात. त्याचा नव्याने अर्थ उमजत असतो. असाच एक किस्सा १९६५ साली घडला होता. आजच्या भाषेत सांगायचं तर ती एक ब्रेकिंग न्यूज होती. अभिनेत्री तनुजाने अभिनेता धर्मेंद्रच्या (Dharmendra) थोबाडीत मारले होते. पुढे बऱ्याच वर्षांनी तनुजाने फिल्म फेअर या मॅगझिनला मुलाखत देताना हा किस्सा पुन्हा एकदा सांगितला होता. काय होता हा किस्सा ? का तनुजाने धर्मेंद्रचे तोंड रंगवले ? हा किस्सा घडला होता १९६५ साली.
दुलाल गुहा यांच्या ‘चांद और सुरज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान या चित्रपटाच्यावेळी धर्मेंद्र (Dharmendra) आणि तनुजा यांची चांगली मैत्री झाली होती. ‘बहारे फिर भी आयेगी’ या चित्रपटापासून या दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली होती. या ‘चांद और सुरज’ चित्रपटाच्या शूटिंग नंतर हे दोघेजण हॉटेलमध्ये जाऊन मद्यपान करत असत. दोघांचाही खूप चांगला वेळ जात असे. दोघेही मद्यपान करत असताना आपले पुढचे प्लॅन्स एकमेकांसोबत शेअर करत असत. एक चांगली मैत्री त्यांच्यामध्ये डेव्हलप होत होती. दोस्तीचा हा सिलसिला बरेच दिवस चालू होता.
परंतु एक दिवस धर्मेंद्रचा तोल गेला. दारूच्या नशेत त्याने तनुजा सोबत फ्लर्ट करायला सुरुवात केली. तनुजा प्रचंड चिडली. तिला धर्मेंद्र कडून हे अनपेक्षित होते. ती त्याला एक चांगला मित्र समजत होती. तिने त्याला समजावून सांगितले आणि त्वेषाने त्याला म्हणाली,” तुला लाज कशी वाटत नाही? तुझ्या बायकोला मी ओळखते. आपले चांगले कौटुंबिक संबंध आहे. मी तुला चांगला मित्र समजत होते. असे असताना तू असले घाणेरडे विचार कसे करू शकतोस? आय शेम ऑन यु….” असे म्हणून ती तावातावाने तिथून निघून गेली. परंतु धर्मेंद्र कुठे ऐकण्याच्या मनस्थितीत होता? जेव्हा जास्तच फ्लर्ट करू लागला तेव्हा तिने खाडकन त्याच्या गालावर एक थप्पड मारली. त्या थप्पडने धर्मेंद्रची खाडकन उतरली. तो भानावर आला. तनुजा त्याला फाड फाड बोलत होती. धर्मेंद्रला खूपच शरमल्यासारखे वाटले. दारूच्या नशेत आपण काय करून बसलो? तो तिची माफी मागू लागला. तिच्या पाया पडून लागला पण तनुजा त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली आणि ती हॉटेलमधून बाहेर जावू लागली. तेव्हा धर्मेंद्रने चक्क तिच्यापुढे हात जोडले आणि म्हणाला,” माझे आई मला माफ कर. माझ्याकडून मोठी चूक झाली. मला तुझा भाऊ बनवून घे.” तेव्हा ती म्हणाली, ” मला माझा एक भाऊ आहे तो पुरेसा आहे.” तरी धर्मेंद्र (Dharmendra) ते ऐकायला तयारच नव्हता.” माझ्याकडून मोठी चूक झालेली आहे. माझ्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही. कृपा करून मला माफ कर. तुझा भाऊ म्हणून मी आयुष्यभर राहील.” धर्मेंद्र (Dharmendra) खूपच आग्रह करू लागला. तनुजाने तिथल्या तिथे एक काळा दोरा घेतला आणि त्याच्या हातावर बांधला. तिथून त्यांच्या दोघांमध्ये भाऊ बहिणीचं नातं निर्माण झालं.
=====
हे देखील वाचा : ‘या’मुळे ट्विंकल खन्नाला पोलीस कोठडीची हवा खावी लागली…
=====
पुढे धर्मेंद्र आणि तनुजा यांच्यातील मतभेद मिटले ते पुन्हा चांगले मित्र झाले. पुढे अनेक चित्रपटातून त्यांनी एकत्र भूमिका केल्या. धर्मेंद्रने आयुष्यात त्याचा आशिकाना मिसाज दाखवत बऱ्याच नायिकांसोबत फ्लर्ट केले होते. ती फार मोठी यादी होती. अगदी मीनाकुमारीपासून सुरू होत होती. पण तनुजा महावस्ताद निघाली. या मराठी मुलीने पंजाबच्या पुत्तरला धडा शिकवला. पुढे ‘दो चोर’, ‘इज्जत’ या चित्रपटातून त्याने नायक नायिकेची भूमिका केली. ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपटातून चरित्र अभिनेते म्हणून त्यांनी एकत्र भूमिका केली.