Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Ott Movie Release : या आठवड्यात कोणत्या कलाकृती येणार भेटीला?
चित्रपटगृहात एकाहून एक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पण काही वेळा धकाधकीच्या जीवनात प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतायेत नसतील तर ओटीटी वाहिन्यांचा ऑप्शनही आहे. विनोदी, अॅक्शन, हॉरर, हॉरर-कॉमेडी, थ्रिलर अशा वेगवेगळ्या पठडीतील आणि भाषेतील चित्रपट उपलब्ध आहेत. दर आठवड्याला नवे चित्रपट, सीरीज ओटीटीवर रिलीज होत असतात. मार्चच्या चौथ्या आठवड्यात कोणत्या कलाकृती रिलीज होणार आहेत पाहूयात…(Ott release march 2025)
मुफासा : द लायन किंग
‘मुफासा : द लायन किंग’ (Mufasa : The Lion King) हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर येत्या २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या एनिमेटेड चित्रपटातील पात्रांना शाहरूख खान आणि त्याची मुलं आर्यन खान व अबराम खान यांनी आवाज दिला आहे. (Entertainment trending news)

डेलुलू एक्सप्रेस (Delulu express)
कॉमेडियन झाकिर खान ‘डेलुलू एक्सप्रेस’ या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा शो अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर २७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. झाकिर खान (Zakir Khan) कविता आणि विनोदांसाठी ओळखला जातो. आता या नव्या शोमधून तो काय कमाल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Bollywood update)

विदुथलाई भाग २ (Viduthalai part 2)
विजय सेतुपतीची प्रमुख भूमिका असणारा विदुथलाई चित्रपट २०२४३ मध्ये आला होत्या याचा दुसरा भाग विदुथलाई २ येत्या २८ मार्चला झी ५ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. विदुथलाईची गोष्ट एका शाळेतील शिक्षकाची आहे. जो कठीण परिस्थितीचा सामना करुन तो नेता कसा बनतो याची कथा यात दाखवली आहे. (Vijay Setupati)
