Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!
दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी लोकांना मनोरंजनाचं महत्वाचं साधन चित्रपट देऊ केलं… अनेक अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करत त्यांनी भारतात चित्रपटांचा पाया रोवला… त्या पाठोपाठ अनेक स्टुडिओ उभे राहिले ज्यात अजरामर झालेल्या अनेक चित्रपटाचं शुटींग आजवर झालं आहे आणि अजूनही सुरुच आहे… ‘मदर इंडिया’ (Mother India) या अजरामर चित्रपटाची निर्मिती करणारं स्टुडिओ म्हणजे मेहबूब स्टुडिओ…हा स्टुडिओ ज्यांनी उभारला ते म्हणजे मेहबूब खान (Mehboob Khan)… चित्रपटांसाठी झपाटलेल्या या व्यक्तीचे चित्रपट आजही आयडिअल चित्रपट म्हणून उल्लेखले जातात.. जाणून घेऊयात फिल्मी वेड्या मेहबूब खान आणि त्यांच्या मेहबूब स्टुडिओबद्दल…(Indian cinema history)

तर.. गुजरातमध्ये जन्मलेल्या मेहबूब खान यांनी वयाच्या १६व्या वर्षी मुंबई गाठली… पण कॉन्सटेबल असणाऱ्या वडिलांनी त्यांना शोधून काढत गुजरातला नेलं आणि लग्न लावून दिलं… संसार सुरु झाला असला तरी मेहबूब यांच्या डोक्यावरुन चित्रपटांचं भूत काही उतरलं नाही… आणि नशीबाने मेहबूब यांची चित्रपटांच्या शुटींगसाठी घोडे पुरवणाऱ्या नूर मोहम्मद यांच्याशी ओळख झाली… मग काय पुन्हा एकदा मेहबूब मुंबईत आले आणि नूर यांच्या घोड्यांच्या पागेत नोकरीला लागले… कारण घोड्यांच्या माध्यमातून त्यांना चित्रपटसृष्टीचा मार्ग दिसत होता…(Bollywood films history)
एक दिवस चंद्रशेखर या दाक्षिणात्य निर्मात्याच्या चित्रपटाच्या शुटींगसाठी मेहबूब घोडा घेऊन गेले आणि तिथे सहायय्क दिग्दर्शकाचं त्यांना काम मिळालं…खरं तर हिरो होण्याचं स्वप्न पाहून मुंबईत आलेल्या मेहबूब यांनी ३० वर्ष एक्स्ट्रा निर्माता म्हणून काम केलं आणि कालांतराने त्यांना कुणीही हिरो करणार नाही हे लक्षात आलं.. मग त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला आणि १९३५ साली मूव्हीटोनच्या चित्रपटासाठी वयाच्या २८ व्या वर्षी मेहबूब यांनी ‘अल हलाल’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यामुळे त्यांना पुढे काही चित्रपट दिग्दर्शनासाठी मिळत गेले…(Entertainment)

मेहबूब यांनी पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर ‘डेक्कन क्विन’ (१९३६) हा अॅक्शनपट केला, त्यानंतर ‘मनमोहन’ (१९३७ हा रोमॅंटिक चित्रपट आणि नंतर ‘जागीरदार’ (१९३७) हा सस्पेन्स चित्रपट केला. मात्र, मेहबूब खान यांना दिग्दर्शक म्हणून खऱी ओळख १९३८ मध्ये आलेल्या ‘हम, तुम और वो’ (Hum, Tum Aur Wo) या चित्रपटाने मिळवून दिली… समाजाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या एका महिलेची गोष्ट त्यांनी या चित्रपटात मांडली होती.. त्यानंतर महिला प्रधान चित्रपट अधिक करावे असा मानस धरुन औरत हा चित्रपट त्यांनी साकारला…त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी नाव कोरणारा चित्रपट ‘मदर इंडिया’ मेहबूब यांनी तयार केला आणि क्लासिक चित्रपटांच्या यादीत नेऊन ठेवला…(Classic movies)

आज खरं तर तंत्रज्ञानाच्या आधुनिकतेमुळे मेकर्स जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन चित्रपटांचं शुटींग करु शकतात…. पण ४०-५० च्या दशकात हे करणं सप्पा नव्हतं… आणि त्याचमुळे धोरणात्क दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून मेहबूब खान यांनी मुंबईच्या मध्यवर्ती स्टुडिओ उभारला.. त्याकाळात फिल्मिस्तान आणि बॉम्बे टॉकीजसारखे स्टुडिओ गोरेगाव आणि मालाडमध्ये होते आणि हा भाग त्याकाळी मुंबईच्या बाहेर होता.
================================
हे देखील वाचा: Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम साथ साथ है’ वेळी अभिनेत्रीचा दिग्दर्शकाला सवाल!
=================================
याच कारणामुळे बड्या सुरस्टार, निर्मात्यांची घरं असणाऱ्या वांद्रा येथे मेहबूब यांनी मेहबूब स्टुडिओ (Mehboob studio) उभारला… १९५४ मध्ये स्टुडिओचं काम पुर्ण झालं आणि समांतर ‘अमर’ चित्रपट तयार केला ज्यात दिलीप कुमार प्रमुख अभिनेते होते. मात्र, हिंदी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच बलात्कार करणारा नायक दाखवल्यामुळे दिलीप कुमार अभिनेते असूनही चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे मेहबूब स्टुडिओचा हा पहिला चित्रपट फ्लॉप झाला होता. या व्यतिरिक्त मेहबूब खान यांनी ‘आन’, ‘अंदाज’, ‘अनमोल घडी’, ‘सन ऑफ इंडिया’सारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले.(Mehboob studio history)
