Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ambat Shaukin Marathi Movie : गौतमी पाटीलच्या घायाळ अदांची प्रेक्षकांना

Manache Shlok Marathi Movie: मृण्मयी देशपांडे झळकणार सहा हिरोंसोबत एका फ्रेममध्ये? ‘मना’चे

Ye Re Ye Re Paisa 3 Poster Launch: अण्णा, आदित्य, बबली

Vadalvaat मालिकेच्या शीर्षक गीताची अनटोल्ड स्टोरी!

Karz movie : ऋषी कपूर-टीना मुनीमचा म्युझिकल हिट ’कर्ज’!

Gulkand ची १ महिन्यानंतरही थिएटरमध्ये जादू; जाणून घ्या बॉक्स ऑफिस

Squid Game 3: पुन्हा फासे पलटणार; येणार नवा ट्विस्ट!

Aamir Khan : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बॉलिवूडमधून एक्झिट घेणार?

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ महाविजेती ठरली यवतमाळची गीत बागडे

 ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ महाविजेती ठरली यवतमाळची गीत बागडे
Mi Honar Superstar Chote Ustad 3 Winner
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ महाविजेती ठरली यवतमाळची गीत बागडे

by Team KalakrutiMedia 14/11/2024

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. विरार येथील जुई चव्हाण, पलाक्षी दीक्षित, पुणे येथील देवांश भाटे, स्वरा किंबहुने, यवतमाळची गीत बागडे आणि संगमनेरच्या सारंग भालके या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत चांगलीच रंगली. अटीतटीच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहीले होते. अखेर यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ च्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता ठरला संगमनेरचा सारंग भालके. विरारच्या पलाक्षी दीक्षितने तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक जुई चव्हाण, देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने यांना विभागून देण्यात आलं. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची विजेती गीत बागडेला पाच लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं.(Mi Honar Superstar Chote Ustad 3 Winner)

Mi Honar Superstar Chote Ustad 3 Winner
Mi Honar Superstar Chote Ustad 3 Winner

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना गीत बागडे म्हणाली की, ”हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या बाबांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी स्पर्धेत भाग घेऊ शकले. या मंचाने फक्त गाणंच नाही तर मला आत्मविश्वासही दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत सर यांचे विशेष आभार. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे.”

Mi Honar Superstar Chote Ustad 3 Winner
Mi Honar Superstar Chote Ustad 3 Winner

पुढे गीत असे ही म्हणाली की, ”मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या मंचाने सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. स्टार प्रवाहने मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या रुपात नव्या पाढीसाठी हा मंच खुला करुन दिला आहे त्यांची देखिल मी ऋणी आहे.”(Mi Honar Superstar Chote Ustad 3 Winner)

===========================

हे देखील वाचा: ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने केला १३०० भागांचा टप्पा पार !

============================

गीत बागडे जरी मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ या पर्वाची विजेती असली तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. खरचरं त्यामुळे ही सर्वच बच्चेकंपनी प्रेक्षकांसाठी आणि परिक्षकांसाठी विजेती आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment geet bagade marathi singing show Mi Honar Superstar Chote Ustad 3 Mi Honar Superstar Chote Ustad 3 Winner Mi Honar Superstar Chote Ustad show singing show Star Pravah
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.