Madan Mohan : संगीतकार मदन मोहन यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार!

Milind Gawali : मिलिंद गवळींचे मालिकाविश्वात कमबॅक
आपल्या भारतामध्ये मालिका म्हणजे प्रत्येक घरातील टीव्हीचा जणू आत्माच. बहुतांश घरांमध्ये टीव्ही फक्त मालिकांसाठीच पाहिला जातो. मालिका बघणारा मोठा वर्ग देशामध्ये आहे. हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये चालणाऱ्या मालिका मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जातात. मराठीमध्ये देखील आपण पाहिले तर आजवर अशा अनेक मालिका आल्या ज्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले. या मालिकांचे गारुड आज अनेक वर्ष झाल्यानंतरही प्रेक्षकांवर कायम आहे. (Milind Gawali)
अशीच एक मराठीमध्ये तुफान गाजलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते? (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने ५ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करताना, लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड तोडले आणि नवीन तयार देखील केले. मालिका आणि मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आज मालिका संपल्यानंतरही लोकांच्या स्मरणात आहे. याच मालिकेतील अफाट प्रसिद्ध झालेली भूमिका म्हणजे अनिरुद्ध देशमुख. अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी साकारलेली ही भूमिका नकारात्मक असली तरी कमालीची भाव खाऊन गेली. (Milind Gawali Post)
मालिका संपल्यानंतर लवकरच या मालिकेतील कलाकारांनी पुन्हा आपले मनोरंजन करावे अशीच प्रेक्षकांची इच्छा होती. यामुळेच काही दिवसांपूर्वीच या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले एका मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. आता मिलिंद गवळी हे देखील ब्रेकनांतर मालिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाहावरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम‘ (Lagnanantar Hoilch Prem) मधून कमबॅक केले. या मालिकेत त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. याचा एक वेगळा मात्र सुखावणारा अनिभव मिलिंद गवळी यांनी सांगितला आहे.(Entertainment Masala)
मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यात लिहिले. “‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मध्ये यशवंतराव भोसले या भूमिकेचे शूटिंग संपवून घरी आलो, सलग पाच-सहा दिवस मिरा रोडच्या एका भव्य दिव्य मोनार्क स्टुडिओमध्ये या मालिकेचं शूटिंग मी केलं, अचानक एका वेगळा विश्वात गेल्यासारखं वाटलं, गेली पाच वर्ष “आई कुठे काय करते” या स्टार प्रवाह वरच्या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका जगत होतो. (Marathi Serial)
आणि ती भूमिका अंगवळणी पडली होती, गेल्या पाच वर्षांमध्ये एक टाटा टी ची ऍड आणि काही इव्हेंट सोडले तर मी सातत्याने अनिरुद्धच साकारत होतो, काही महिन्यापूर्वीच मालिका संपली, स्वतःसाठी घरच्यांसाठी मित्रमंडळी नातेवाईकांसाठी वेळ देत होतो, आणि अचानक शशांक सोळंकी जो मराठी मालिका विश्वातला मोठा निर्माता आहे, जो माझ्या कॉलेजमधला वर्गमित्र पण आहे, त्याने मला त्याच्या लोकप्रिय मालिकेमध्ये म्हणजेच “लग्नानंतर होईलच प्रेम” मध्ये पाहुणा कलाकार म्हणून एक महत्त्वपूर्ण भूमिका करण्यासाठी विचारलं. (Top Stories)
स्टार प्रवाह ने पण त्या गोष्टीला दुजोरा दिला, आणि मी उत्साहामध्ये या मालिकेच्या सेटवर पोहोचलो, माजी कल्याण मंत्री यशवंतराव भोसले ही भूमिका मला साकारायला मिळाली, सलग सहा दिवस या यशवंतराव भोसले च्या भूमिकेमध्ये होतो, आणि आत्ताच ती भूमिका संपवून घरी आलो, आणि मला फारच भारी वाटत आहे, एका छोट्याशा कालावधीमध्ये, मनाला समाधान देणारी अशी भूमिका मला साकारायला मिळाल्याचा एक वेगळा आनंद होत आहे, स्टार प्रवाह वरच्या “आई कुठे काय करते” या अतिशय गाजलेल्या मालिकेनंतर मला पुन्हा स्टार प्रवाहवर काम करायला मिळालं याचा पण आनंद वेगळा आहे. (Marathi Latest News)
आपण ज्यांच्या बरोबर काम करतो, ते काम पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला पुन्हा काम करण्यासाठी बोलावणं येतं, त्या गोष्टीचं समाधान वेगळंच असतं, मालिका निर्माता शशांक सोळंकी जो माझा वर्गमित्र आहे, एकाच बाकावर आम्ही कॉलेजमध्ये बसायचो, दोघांना chess खेळाची अतिशय आवड, कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आम्ही दोघं चेस खेळत असू, एकमेकांच्या घरी येणं जाणं , वर्गमित्र निर्माता आणि त्याच्या मालिकेमध्ये आपण काम करतो आहे, या गोष्टीचा ही आनंद आणि समाधान हे मनाला सुखावणारं आहे. (Marathi Serial News)
======
हे देखील वाचा : Prasad Oak : सहाय्यक दिग्दर्शकापासून सुरु झाला होता प्रसाद ओकचा अभिनय प्रवास
======
“लग्नानंतर होईलच प्रेम” या मालिकेचे कलाकार आणि तंत्रज्ञान माझ्यासाठी तसे अनोळखी होते, काही मोजके कलाकार सोडले तर पहिल्यांदा काम करत होतो सगळ्यांबरोबर, फक्त अविनाश नारकर, जानवी ताई पणशीकर, यांच्याबरोबरच आधी मी काम केलं होतं. पण सेटवर गेल्यानंतर मला मी त्यांच्या या कुटुंबात नवीन आहे किंवा एक पाहुणा आहे असं अजिबात वाटलं नाही. दिग्दर्शक भरत गायकवाड यांच्या बरोबर काम करून समाधान वाटलं. खूपच मजा आली.”