Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Milind Gawali अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ जाहीर झाल्यानंतर मिलिंद गवळी यांनी शेअर केली खास पोस्ट

 Milind Gawali अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ जाहीर झाल्यानंतर मिलिंद गवळी यांनी शेअर केली खास पोस्ट
टीव्ही वाले

Milind Gawali अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ जाहीर झाल्यानंतर मिलिंद गवळी यांनी शेअर केली खास पोस्ट

by Jyotsna Kulkarni 26/01/2025

मराठी मनोरंजनविश्वातील दिग्गज आणि प्रतिभासंपन्न अभिनेते अशी ओळख असणाऱ्या अशोक सराफ (Ashok Saraf) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील अनेक दशकांपासून नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची करमणूक केली. हा पुरस्कार त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा आनंद घेऊन आला आहे. कलाकारच नव्हे तर सामान्य लोकं देखील सोशल मीडिया त्यांचा आनंद व्यक्त करत अशोक मामांचे अभिनंदन करताना दिसत आहे. (Milind Gawali)

अशातच मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी देखील अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. अशातच अभिनेते मिलिंद गवळी यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. सोबतच अशोक मामा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील शेअर केला आहे. (Milind Gawali Shared Special Post)

मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “पद्मश्री अशोक सराफ , हे ऐकायला किती छान वाटतं “पद्मश्री” , आपल्या माणसाला “पद्मश्री” मिळालं याचा किती आनंद वाटतो, आमच्या अशोक मामांना “पद्मश्री” मिळाली याबद्दल मला खूपच आनंद झालाय, अनेक वर्षापासून अनेक चित्रपटांमध्ये मी अशोक मामा बरोबर काम केलं असल्यामुळे ही “पद्मश्री” जी पदवी त्यांना देण्यात आली ती पदवी ते किती डिजर्व Deserve करतात हे मला माहिती आहे. (Marathi Top News)

त्यांना पद्मश्री मिळायलाच हवी होती, जी त्यांना मिळाली, मला खूपच आनंद झाला. मी अशोक मामा बरोबर काम करायला सुरुवात केली, त्याच्या 25 वर्ष किंवा 30 वर्ष आधीपासूनच त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली होती, मी त्यांच्याबरोबर पहिला चित्रपट “सुन लाडकी सासरची” केला तेव्हाच ते सुपरस्टार होते, त्यानंतर पुढे सात सिनेमांमध्ये मला त्यांच्याबरोबर काम करायचा योग आला, आणि त्यांच्या बरोबर काम करण्याच्या माझ्या प्रवासामध्ये मी त्यांच्याकडून खूप शिकलो.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

त्यांचा एक उत्तम गुण म्हणजे कामाशी प्रामाणिक राहणे, अशोक मामांना मी सातत्याने त्यांच्या कामाविषयी आस्था, त्यांच्या भूमिका वरचा त्यांचा पूर्वभ्यास, वक्तशीरपणा, आणि भरभरून Talent, हे मी सातत्याने पहात आलोय, आमच्या सिनेमांमध्ये इतरही दिग्गज अनुभवी मोठे कलाकार असायचे, पण त्यांच्यातलं वर्षानुवर्ष काम करून कामाविषयी Passion निघून गेल्याचं जाणवायचं, आणि एका बाजूला अशोक मामा 35-40 वर्ष सातत्याने काम करून सुद्धा कामाविषयीची त्यांची आस्था आणि त्यांचं नवोदित कलाकारास सारखं passion, energy बघून अचंबित व्हायला व्हायचं,

एखाद्या दिग्दर्शकाचं किंवा एखाद्या कलाकारचं Casual Approach बघून अशोक मामांचा संताप व्हायचा, त्या कारणासाठी मी त्यांची बरेच वेळा चिडचिड सुद्धा पाहिली आहे, त्यांचं म्हणणं असायचं की जर प्रामाणिक सिनेमा करायचा नसेल, तर मग करताच कशाला सिनेमा, का माझा आणि सगळ्यांचा वेळ फुकट घालवताय, आणि प्रेक्षकांच्या पण डोक्याला का ताप देताय, सिनेमा करायचा असेल तर तो प्रामाणिकच केला पाहिजे, असं त्यांचं सतत म्हणणं असायचं खरच म्हणूनच ते एक वेगळे कलाकार आहेत.

आणि कदाचित म्हणूनच इतक्या वर्षानंतर त्यांच्या या प्रामाणिक कामाचं कौतुक म्हणून त्यांना पद्मश्री देण्यात आलय, आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की पद्मश्री अशोकराव सराफ यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. अशोक मामा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

=========

हे देखील वाचा : Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द

=========

दरम्यान अशोक सराफ यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. जवळपास पाच दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अशोक सराफ आजही अभिनयात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असून, मालिका विश्वातील ते प्रसिद्ध अभिनेते आहेत.

सध्या अशोक सराफ कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. तर काही महिन्यांपूर्वीच त्यांचा ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपट आला होता. यासोबतच नाटकांमध्ये देखील सक्रिय आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor ashok saraf Celebrity Entertainment marathi Marathi Actor Marathi Movie Milind Gawali Milind Gawali and Ashok saraf Milind Gawali post Milind Gawali post on ashok saraf padmashree ashok Saraf अशोक सराफ अशोक सराफ आणि मिलिंद गवळी पद्मश्री अशोक सराफ मिलिंद गवळी मिलिंद गवळी पोस्ट
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.