Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात

Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार

Super Duper Marathi Movie Teaser:  ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष;

Big Boss Marathi 6 :  रितेश देशमुखने तन्वीला दाखवला आरसा!

Riteish Deshmukhच्या गाजलेल्या चित्रपटाचा तब्बल २० वर्षांनी येणार सीक्वेल!

मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने

Jai Jai Swami Samarth Serial: होळी पौर्णिमेला रंगणार थरारक पर्व;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मिलिंद सोमणचा नवा लूक….

 मिलिंद सोमणचा नवा लूक….
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

मिलिंद सोमणचा नवा लूक….

by सई बने 11/11/2020

पहिला सुपर मॉडेल म्हणून ओळखले जाणारे मिलिंद सोमण आणि वाद यांचं नात आहे. किंबहुना सोमण यांच्या पोस्टमुळे हे वाद आपसूक त्यांच्याभोवती फिरत असतात. आत्ताच आपला 55 वा वाढदिवस साजरा करणारे सोमण पुन्हा एकदा वादात सापडले. त्याला निमित्त झालं ते त्यांच्या एका फोटोचं. गोव्याच्या बीचवर वाढदिवस साजरा करतांना मिलिंद यांनी त्यांचा धावतांनाचा न्यूड फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला. या त्याच्या फोटोवर अनेक मिम्स तयार झाले. वाद झाले. मिलिंद सोमण यांच्यावर वास्को पोलीस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली.  एकूण काय 4 नोव्हेंबर हा मिलिंद सोमण यांचा वाढदिवस चांगलाच गाजला. आणि अद्यापही त्यावरुन तयार झालेला वाद कमी झाला नाही. पण या वादामुळे मिलिंद सोमण हे नाव गेले दहा दिवस चर्चेत आहे, आणि आता या चर्चेत अजून वाढ होणार आहे. कारण मिलिंद यांनी आपल्या नवीन पोस्टमध्ये स्वतःचाच एक नवा लूक शेअर केला आहे. अर्ध्या चेह-यावर गुलाल, नाकात मोठी रिंग, डोळ्यात काजळ घातलेला मिलिंदचा चेहरा त्यांच्या पुढच्या प्रोजक्टची चुणूक देतोय. त्यावरुनच प्रसिद्धीचा प्रवाह कसा वळवायचा याची उत्तम जाण असलेल्या मिलिंद सोमण यांनी वाढदिवसाला न्यूड फोटो पोस्ट करुन या त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी प्रसिद्धी मिळवली की काय हा प्रश्न विचारण्यात येतोय. 

मिलिंद सोमण आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. आता वयाच्या 55 व्या वर्षीही फिटआणि फाईन असलेल्या सोमण यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फिटनेसबाबत संवाद साधला होता आणि त्यांचं कौतुक केलं होतं. सोमण यांच्या फिटनेस संदर्भातील व्हिडीओना अनेकांची पंसंती असते. तरीही मिलिंद सोमण या नावाभोवती वाद अनेक असतात. 1995 मध्ये त्यांनी मॉडेल मधु सप्रेसोबत एका शूजच्या जाहीरातीसाठी केलंलं न्यूड फोटोशूट असो किंवा 25 वर्ष लहान असलेल्या अंकीता कुंवर बरोबर केलेला विवाह असो. मिलिंद सोमण यांना प्रसिद्धीचं वलय कायम लाभलं. त्यात वादाची भरच जास्त होती. आपल्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करतांना ही वादाची परंपरा मिलिंद यांनी कायम ठेवली आहे. आता त्यांच्यावर सार्वजनिक स्थळी अश्लिलता पसरवणारे वर्तन केल्याबद्दल तक्रार दाखल झाली आहे. याबद्दल गुन्हा सिद्ध झाला तर सोमण यांना तीन महिन्याची शिक्षाही होऊ शकते. सोशल मिडीयावर काही सेलिब्रिटींनी त्यांची बाजू घेतली तर काहींनी मिलिंदच्या वाढत्या वयाचा आणि बुद्धीचा संबंध जोडत त्यांच्यावर टिका केली. पण या वादाची मिलिंद यांना जाणीव होतीच. आता त्यांच्या नव्या पोस्टनं पुन्हा एकदा सोशल मिडीयावर मिलिंद सोमण या नावाची चर्चा रंगली आहे. 

अक्षय कुमारचा लक्ष्मी लूक फारसा प्रभावी झाला नाही. मात्र त्याचवेळी मिलिंदनं आपला फोटो शेअर करत चाहत्यांची उत्सुकता चाळवली आहे. चेह-याच्या एका भागावर रंग, नाकात मोठी रिंग, डोळ्यात काजळ आणि रोखलेली नजर असा हा मिलिंदचा फोटो जेवढा बोलका आहे, तेवढीच त्याची कॅप्शनही बोलकी आहे. ‘मला माहित आहे, आता होळी नाही. पण गेल्या काही दिवसांपासून मुंबईजवळ असलेल्या कर्जतमध्ये काही मजेशीर गोष्टी केल्या आहेत. लवकरच त्याबद्दल सांगेन अशा शब्दात मिलिंदनं या फोटोची कॅप्शन देऊन चाहत्यांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण केली आहे. मिलिंद सोमण यांच्या एका भूमिकेचा हा फोटो आहे, अशी चर्चा आता सोशल मिडीयावर रंगली आहे. अर्थात ही चर्चा चांगली रंगल्याशिवाय मिलिंद लगेच खुलासा करणार नक्कीच नाहीत. त्यासाठी त्यांच्या चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Entertainment model
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.