
रॉ एजंटच्या मिशनवर आधारित असलेला ‘मिशन मजनू’
रॉ एजंटच्या मिशनवर आधारित असलेला मिशन मजनू (Mission Majnu) हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. 20 जानेवारी रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 1971 मध्ये भारताने पाकिस्तानसोबतच्या युद्धात विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब बनवण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यासंबंधीची कथा या मिशन मजनू (Mission Majnu) चित्रपटात आहे. दिग्दर्शन शंतनू बागची यांच्या या चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्रानं खास मेहनत घेतली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदान्ना यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘मिशन मजनू’ 20 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू बाग यांनी केले असून अमर भुताला, गरिमा मेहता, रॉनी स्क्रूवाला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपटात भारत पाकिस्तान संबंधांवर आधारीत आहे. या चित्रपटात 1970 चा काळ उभारण्यात आला आहे. त्या काळी घालत असलेले कपडे, तेव्हाचे सेट उभारण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1970 जीवनमान कसे असेल याचा अभ्यास करुन कपडे आणि सेट उभारण्यात आले आहेत. अगदी लांब कॉलर शर्टपासून बेल बॉटम पँटपर्यंतचे पोशाख या मिशन मजनू चित्रपटात दिसणार आहेत.
चित्रपटात एकाच वेळी तीन ट्रॅक असणार आहेत. एकीकडे चित्रपटाचा अभिनेता तारिक (सिद्धार्थ मल्होत्रा) चे मिशन. तारीक हा रॉ एजंट आहे. दुसरीकडे तारिक आणि नसरीन (रश्मिका मंदान्ना) यांची प्रेमकथा सांगण्यात आली आहे. या सोबत चित्रपटात राजकीय पार्श्वभूमी देखील दाखवण्यात आली आहे. त्यावेळच्या भारत-पाकिस्तानच्या संबंधांचा ट्रॅकही या चित्रपटात दिसणार आहे.
चित्रपटात सिद्धांर्थ आणि रश्मिकासह परमीत सेठी, सारीब हाशिमी, कुमुद मिश्रा, रजित कपूर आदींच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा 1971 च्या आसपासची आहे. तेव्हा भारतानं पाकिस्तानवर विजय संपादन केला. मात्र भारतानं हे युद्ध जिंकल्यावर पाकिस्तान खूप अस्वस्थ होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याच वेळी भारताने आपल्या रॉ एजंटला एक मिशन दिले होते. त्यावर मिशन मजनू (Mission Majnu) चित्रपटाची कथा आधारित आहे. एका वास्तविक कथेवर हा चित्रपट असल्याची माहिती दिग्दर्शक शंतनू बागची यांनी दिली. या चित्रपटाचे चित्रीकरण लखनौ आणि मुंबईत झाले आहे. मुंबईतील फिल्मसिटी व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी 60 ते 65 दिवस लागले. जवळपास 60-65% चित्रीकरण लखनौमध्ये झालेय. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये पाकिस्तानचे आयएसआयचे मुख्यालय आणि पंतप्रधानांच्या घराचा सेट लावण्यात उभारण्यात आला होता.
=====
हे देखील वाचा : 2022 च्या बॉक्स ऑफीसवर बॉलिवूडपेक्षा टॉलिवूडचं वर्चस्व!
=====
नेटफ्लिक्सवर हा चित्रपट एकाच दिवशी 200 देशांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटासाठी सिद्धांर्थ मल्होत्रानं बरीच मेहनत घेतली आहे. सिद्धांर्थ पाकिस्तानमध्ये उपजीविकेसाठी टेलरींगचे काम करतो. यासाठी 1971मधील शिलाई मशीन मिळवण्यात आली. ही मशिन चालवणे कठीण असते. पायानं चालवण्यात येणारी ही मशिन चालवण्यासाठी सिद्धांर्थनं दोन महिन्याचे प्रशिक्षण घेतले. सिध्दार्थने मशिन चालवण्यापासून ते सुई आणि धाग्याने शिवणकामापर्यंतचे शिवणकाम शिकण्यासाठी मेहनत घेतली आहे. या चित्रपटात रश्मिका ही अंध मुलगी झाली आहे. रश्मिकानेही ही भूमिका साकारण्यासाठी मुंबईत प्रशिक्षण घेतले. 20 जानेवारीसाठी येणा-या या चित्रपटासाठी सिद्धांर्थ आणि रश्मिका दोघेही उत्सुक आहेत.