महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
अवतार…पाण्याखालील जगासाठी आधुनिक तंत्रज्ञान
अवतार (Avatar) द वे ऑफ वॉटरची रिलीजची तारीख जवळ येत आहे तशी त्याबद्दलची उत्सुकता अधिक वाढत आहे. अवतारचे निर्माते दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी हे पाण्याखालचे जग दाखवण्यासाठी भव्य अशा पाण्याच्या टाक्या निर्माण केल्या होत्या. या पाण्याच्या टाक्यांमध्ये कलाकारांसह तंत्रज्ञांनानी अनेक तास काम केले आहे. या सर्वासांठी नवीन साधनांची निर्मिती करण्यात आली. अनेक तासांच्या कष्टाचे फळ म्हणजेच अवतार द वे ऑफ वॉटरमधील स्पेशल इफेक्टचे यश मानले जाते.
अवतार चित्रपटाचा नवा पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटातील जे जेक, नेतिरी, त्यांची मुले यांना या पोस्टरद्वारे दाखवण्यात आले आहे. याशिवाय पाण्याखालील निळ्या जगाची एक झलक दाखवली आहे. पाण्याचे हे चमत्कारिक आणि सुंदर जग दाखवण्यासाठी हॉलिवूडपटात प्रथमच एक वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. निर्माते दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन हे हॉलिवूडमध्ये प्रयोगशील निर्माते म्हणून ओळखले जातात. ऑस्कर विजेते कॅमेरॉन यांनी यावेळी अवतार द वे ऑफ वॉटर या चित्रपटातून पाण्याखालचे जग दाखवण्यासाठी मोशन कॅप्चर सिनेमॅटोग्राफी केली आहे. अवतार(Avatar) द वे ऑफ वॉटर या चित्रपटाची प्रसिद्ध झालेली चित्रे बघता, चित्रपटाच्या शूटिंगसाठी किती तयारी करावी लागली असेल, याचा अंदाज येतो. अवतारच्या या दुसऱ्या भागात अर्धेअधिक शुटींग पाण्याखाली झाले आहे. समुद्राच्या लाटांचा प्रभाव आणि तितकीच खोली आणण्यासाठी जेम्स कॅमेरून यांनी मॅनहॅटन बीच स्टुडिओमध्ये अगदी समुद्रासारखा दिसणारा सेट तयार केला होता. यासाठी 120 फूट लांब, 60 फूट रुंद आणि 30 फूट खोल म्हणजेच 10 लाख लिटर पाणी राहू शकेल अशी कृत्रिम टाकी बांधण्यात आली. ही टाकी तयार झाल्यावर चित्रपटातील कलाकारांनी या टाकीत सराव केला. काही महिने सराव केल्यावरच चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूने त्याच्या आत चित्रपटाचे चित्रीकरण केले.
अर्थात हा पाण्याखाली काम करण्याचा अनुभव खूप खडतर होता. त्यासाठी जेम्स कॅमेरॉन यांनी आपल्या टीमसोबत अनेक महिने तयारी केली. अगदी अवतारमधील प्रत्येक दृश्याचा विचार करण्यात आला आणि त्या दृश्याच्या चित्रीकरणापूर्वी त्याचे रेखाचित्रे कागदावर तयार करण्यात आले. पाण्याखालील कलाकारांचे हावभाव आणि चेहऱ्यावरील हावभाव कॅमेऱ्यात व्यवस्थित कसे नोंदवता येतील याचाही मोठा सराव करण्यात आला. सरावादरम्यान कलाकारांनी केलेले हावभाव अनेक वेळा पडद्यावर बघण्यात आले. मग त्यात सुधारणा करुन पुन्हा त्या सुधारीत अभिनयाचा सराव करण्यात आला आणि मगच वास्तविक चित्रिकरणाला सुरुवात झाली.
========
हे देखील वाचा : “बेटे आज तुने मुझे हरा दिया!” असं किशोर कुमार अमित कुमारला का म्हणाले?
========
चित्रपटातील कलाकार वास्तववादी पद्धतीने पोहताना दिसावेत यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर कॅमेरेही लावण्यात आले होते. अनेक कॅमे-यांची व्यवस्था पाण्याखालीही होती. यासाठी नवीन पद्धतीचे कॅमेरे बनवून घेण्यात आले होते.
13 वर्षापूर्वी अवतारचा(Avatar) दुसरा भाग मोठ्या पडद्यावर येत आहे. पहिल्या भागात अवतारनं अक्षरशः मोहिनी घातली होती. आता दुस-या भागात जेम्स कॅमरुन यांनी घेतलेली मेहनत बघता, अवतार: द वे ऑफ वॉटर बॉक्सऑफीसवर मोठं यश संपादन करेल असा अंदाज समिक्षकांनी व्यक्त केला आहे. 16 डिसेंबर रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल. इंग्रजीशिवाय हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी अवतारसाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला. त्यामुळेच कल्पनेतील पॅंडोरो या जगाला जिवंत करण्यास मदत झाली. अर्थात पहिला भाग प्रदर्शित झाल्यावर अवतारचा दुसरा भाग 13 वर्षांनी येत आहे, हा त्यासाठी एक मोठा अडथळा असल्याचेही मानण्यात येते. कारण अवतारची क्रेझ कमी झाली तर…हा प्रश्नही आहे. जेम्स कॅमरुन यांनी आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या हट्टापोटीच एवढा वेळ घेतला. अन्यथा पाण्याखालचे जग दाखवण्यासाठी रिकाम्या टॅंकमध्ये चित्रिकरण करण्याचा पर्याय त्यांना सुचवण्यात आला होता. पण त्यांनी(Avatar) तो नाकारुन पाण्याखालीच चित्रिकरण करण्याचा प्रयत्न चालू ठेवला. त्यासाठी नवीन तंत्र सामुग्री डिझाईन करुन बनवण्यात आला. त्यात मोठा खर्च झाला. शिवाय पाण्याखाली चालणारे कॅमेरे वापरण्याचे प्रशिक्षणही कॅमेरामनला देण्यात आले. यातही वेळ गेला. शिवाय कोरोनामुळे हे सर्व चित्रिकरण पुढे ढकलण्यात आले. आता हा 13 वर्षाचा काळ अवतारसाठी फायदेशीर ठरतो की नुकसानकारक हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
सई बने