Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mohammed Rafi : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गायले म.रफीसोबत गाणे!

 Mohammed Rafi : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गायले म.रफीसोबत गाणे!
बात पुरानी बडी सुहानी

Mohammed Rafi : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गायले म.रफीसोबत गाणे!

by धनंजय कुलकर्णी 20/01/2025

मोहम्मद रफी (Mohammed Rafi) या गुणी आणि प्रतिभावान पार्श्वगायकाने आपल्या आवाजातील जादूने भारतीय चित्रपट संगीतातील सर्वाधिक यशस्वी गायक म्हणून नावलौकिक कमावला आहे. रफी यांचे नाव आज देखील संगीताच्या दुनियेत मोठ्या आदरपूर्वक घेतली जाते. ते जितके उत्कृष्ट गायक होते त्याहून अधिक संवेदनशील आणि मदत करणारे व्यक्तिदेखील होते. अनेक छोट्या छोट्या संगीतकारांकडे त्यांनी दर्जेदार असं गायन केला आहे. पैसा हा कधीच त्यांच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. त्यामुळे संगीतकार कोणीही असो मोठा की छोटा गाण्यात भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. आपल्या गळ्यातून उमटलेले सर्वोत्कृष्टच ते देत गेले. हा किस्सा सत्त्तर च्या  दशकातील आहे.

अमिताभ बच्चन यांनी मिस्टर नटवरलाल या १९७८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून पार्श्वगायन सुरुवात केली. सुरुवातीला गंमत म्हणून गायलेले गाणं मात्र त्यांना पुढे अनेक गाणी गायला लावायला भाग पडले. नंतर अनेक चित्रपटातून ते गात राहिले पण १९८१ साली प्रदर्शित झालेल्या एका सिनेमात अमिताभ बच्चन यांना चक्क मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांच्यासोबत गाण्याचा योग आला होता! तसाच योग त्यांना याच वर्षी प्रदर्शित झालेल्या एका सिनेमात सूरश्री लता मंगेशकर यांच्यासोबत गाणं गायचा योग आला होता.

म. रफी यांच्या स्वराची भुरळ अमिताभ बच्चन लहानपणापासूनहोती. ते या आवाजाचे दिवाने होते. मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘नसीब’ हा चित्रपट १९९८१ साली प्रदर्शित झाला पण या गाण्याचा रेकॉर्डिंग बहुदा १९७९ साली झाले होते. हे गाणं चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालं होतं. अमिताभ बच्चन स्वतःसाठीच्या ओळी या गाण्यात गाणार होते तर मोहम्मद रफी ऋषी कपूर यांच्यासाठी पार्श्वगायन करणार होते. हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं तर त्याला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते गाण्याची बोल होते, ‘चल चल मेरे भाई तेरे हात जोडता हु हात जोडता हु तेरे पाव पडता हू’. (Entertainment mix masala)

जेव्हा अमिताभ बच्चन यांना कळाले की आपल्यासोबत साक्षात रफी गाणार आहेत तेव्हा ते थोडेसे नर्वस झाले. एवढ्या मोठ्या जागतिक दर्जाच्या गायकासमोर आपण कसे काय गाऊ शकू? याची त्यांना काळजी वाटू लागली. त्याचबरोबर त्यांच्यासोबत गाण्याची माझी लायकी तरी आहे का असा दुष्ट विचार देखील त्यांच्या मनात येऊन गेला. त्यामुळे रात्रभर अमिताभ बच्चन झोपू शकले नाही. आदल्या दिवशी मनमोहन देसाई यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितले, ”रफी वेळेच्या बाबत अत्यंत काटेकोर आहेत त्यामुळे तू देखील वेळेत रेकोर्डिंग स्टुडीओमध्ये उपस्थित राहा.” अमिताभ आणि रफी दोघे एकाच वेळी स्टुडिओमध्ये आले गाण्याची रिहर्सल सुरू झाली.

या गाण्यांमध्ये अमिताभ बच्चन यांना गाण्यापेक्षा काही डायलॉग म्हणायचे होते ते डायलॉग पाहिल्यानंतर मात्र अमिताभ बच्चन आणखी नर्व्हस झाले आणि चेहरा पाडून बसले. रफी यांच्या काही लक्षातच आले नाही. त्यांनी अमिताभ बच्चन यांना विचारले, ”काय झाले?” त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, ”रफी साहेब, मी तुमच्यासोबत कसा काय गाऊ शकतो? कारण या गाण्यांमध्ये जे काही मला डायलॉग दिलेले आहेत आणि जे काही मी तुम्हाला उद्देशून गाणार आहे ते मला अजिबात पटत नाही!” म. रफी (Mohammed Rafi) यांनी विचारले, ”काय डायलॉग आहे?” त्यावर अमिताभ बच्चन यांनी गाण्याचा कागद त्यांना दाखवला.

त्यात लिहिले होते ‘चल हाट, साले दूंगा खिच के अभी चल जा, चल जा साले… अबे साला घुसता ही चल जा रहा है…’ अमिताभ बच्चन म्हणाले, ”आता मला सांगा हे असले उद्धट शब्द आणि ही वाक्य मी तुमच्या बाबत कसे काय म्हणू शकतो?” त्यावर म. रफी साहेब म्हणाले, ”असं काही नाही. आपण कॅरेक्टरसाठी गात असतो. तिथे तू जरी मला उद्देशून हे शब्द म्हणत असला तरी ते मला लागू पडत नाहीत. त्यामुळे निशंक होऊन गा. तू नक्कीच चांगलं गाशील आणि आज खरं तर मी माझा सन्मान समजतो. एका सुपरस्टार सोबत मला गायला मिळत आहे!” (Untold stories)

रफी (Mohammed Rafi) साहेबांचा साधेपणा आणि डाऊन टू अर्थ असण्याचा स्वभाव पहा ते अमिताभ बच्चन यांना म्हणाले की, ”आज मला खूप अभिमान वाटतो आहे की तुमच्यासोबत मला गाणं गायला मिळत आहे.”  यानंतर गाण्याच्या बऱ्याच रिहर्सल झाल्या रफी सोबत गाताना अमिताभ बच्चन थोडे घाबरत होते पण हळूहळू ते तयार झाले. शेवटी रफीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ”आता आपण मित्र आहोत. तू बिनधास्त गा.” त्या पद्धतीने गाण्याचे रेकॉर्डिंग झालं.

=============

हे देखील वाचा : Shatrughan Sinha : ‘हे’ पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष शत्रुघ्न सिन्हाला आपला मुलगा मानत!

=============

रेकॉर्डिंग झाल्यानंतर घरी जेव्हा रफी पोहोचले त्यावेळेला घरच्यांना सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं, ”तुम्हाला माहित आहे का आज माझ्यासोबत कोण गात होतं? मी आज सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाणं रेकॉर्ड करून आलो आहे!” मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांचे चिरंजीव शाहिद मोहम्मद रफी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला होता. दुर्दैवाने हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्यावेळेला रफी अल्लाला प्यारे झाले होते. पण हे गाणं देखील खूप गाजलं आणि अमिताभ बच्चन यांच्यासाठी ते एक संस्मरणीय असं गाणं ठरलं.

२०१२  साली त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये या गाण्याबद्दल लिहिताना सांगितलं होतं की, “म. रफी (Mohammed Rafi) सारखा हिमालयासारख्या उंचीचा माणूस किती डाऊन टू अर्थ होता हे मला त्या दिवशी कळालं. रफी साहेबांचे अनेक गाणी माझ्यावर चित्रित झाली होती या महान कलाकारांच्या गाण्यांमुळेच मी सुपरस्टार बनू शकलो!”

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Amitabh Bacchan Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured Mohammed Rafi Mr. natwarlal naseeb recording
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.