Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mohanlal यांच्या ‘या’ चित्रपटाने रिलीजआधीच कमावले ३५० कोटी!

 Mohanlal यांच्या ‘या’ चित्रपटाने रिलीजआधीच कमावले ३५० कोटी!
मिक्स मसाला

Mohanlal यांच्या ‘या’ चित्रपटाने रिलीजआधीच कमावले ३५० कोटी!

by रसिका शिंदे-पॉल 03/12/2025

रोमॅंटिक, हॉरर चित्रपटांपेक्षा अलीकडे प्रेक्षकांचा कल थ्रिलर, क्राईम थ्रिलर चित्रपटांकडे अधिक पाहायला मिळतोय… अशातच ‘दृश्यम’ (Drishyam) या साऊथ आणि त्याच्याच हिंदीतील रिमेकने तर प्रेक्षकांना वेडच लावलं… ‘कांतारा’, ‘कल्की’, ‘पुष्पा’, ‘केजीएफ’ अशा बऱ्याच साऊथ चित्रपटांना भरघोस प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींच्या पुढे कमाई होतेय.. (South Indian Films) अशातच काही ठराविक चित्रपटांच्या सीक्वेल्सची आपण आतुरतेने वाट पाहात असतो आणि त्यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘दृश्यम’… लवकरच ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) येणार असून कमाईच्या यादीत या चित्रपटाने रिलीजपूर्वीच ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे… (Entertainment News)

सध्या कोणत्याही भाषेतील चित्रपट रिलीजआधीच तिकीट विक्रीच्या शर्यतीत १०० कोटींचा टप्पा पार करतायत.. याच ॲडव्हॉन्स बुकिंगचा ‘दृश्यम ३’ ला फायदा झाला असून चित्रपटाने चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तब्बल ३५० कोटी कमावले आहेत… यात दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते मोहनलाल (Mohanlal) प्रमुख भूमिकेत आहेत.. (Malayalam Movies)

मोहनलाल यांचा ‘दृश्यम’ या मल्याळम चित्रपट असून आता तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… मल्याळम भाषेत सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाचा निशिकांत कामत (Nishikant Kamat) यांनी हिंदीत रिमेक केला ज्यात अजय देवगणची प्रमुख भूमिका आहे… दरम्यान, मल्याळम पाठोपाठ हिंदीतही ‘दृश्यम ३’ लवकरच येणार आहे…(Ajay Devgan)

आता मल्याळम ‘दृश्यम’बद्दल बोलायचं झालं तर, २०१३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं बजेट ३ कोटी होतं. जिथू जोसेफ यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसरा भाग २०२१ मध्ये आला होता… दरम्यान, तिसऱ्या भागाच्या रिलीज आधीच चित्रपटाच्या कमाईबद्दल चित्रपटाचे निर्माते एम रेनजीथ यांनी म्हटलं की, “या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ३५० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, पनोरमा स्टुडिओने त्यांच्या चित्रपटाचे देशातील आणि परदेशातील थिएटरचे हक्क विकत घेतले आहेत. यासह त्यांनी डिजिटल राईट्सही विकत घेतले आहेत. यासह हा चित्रपट पहिला प्रादेशिक चित्रपट ठरला आहे, ज्याने प्रदर्शनापूर्वीच इतकी कमाई केली आहे”.

================================

हे देखील वाचा : Drishyam 3: ठरलं ! अजय देवगन बनवणार ‘दृश्यम 3’, मोहनलाल ही आणणार तिसरा पार्ट; कोणाची जादू चालणार?

================================

आता नेमकी मोहनलाल यांचा ‘दृश्यम ३’ कधी येणार? पुढचा ट्विस्ट काय असणार? आणि त्यापाठोपाठ हिंदीतील अजय देवगणचा ‘दृश्यम ३’ कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत… दरम्यान, हिंदी रिमेकमध्ये अजय देवगण, तब्बू, योगेश सोमण, कमलाकर सावंत यांच्या प्रमुख भूमिका होत्या… (Drishyam 3 movie)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan Bollywood Chitchat bollywood update crime thriller movies dadasaheb phalke award drishyam 3 drishyam movie Entertainment News malayalam movies mohanlal south indian film Tabu
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.