रेकॉर्डिंगच्या वेळी झालेली चूक Kishore Kumar यांनी शूटिंगच्या वेळी कशी

Sridevi यांच्या ‘मॉम २’ मध्ये ही अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत!
ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी ८०-९०चं दशकं सौंदर्य आणि अभिनयानं गाजवलं… आजही त्यांचे प्रत्येक चित्रपट चाहत्यांच्या लक्षात आहेत… २०१७ मध्ये त्यांचा ‘मॉम’ (Mom Movie) हा अभिनेत्री म्हणून शेवटचा चित्रपट ठरला… परंतु, त्यांचं आकस्मिक निधन मनाला चटका लावून गेलं… आता ८ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल येणार असून यात एक खास अभिनेत्री मॉम २ मध्ये दिसणार आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, बोनी कपूर यांनी ‘मॉम २’ (Mom 2) ची घोषणा फार आधीच केली होती… आणि आता प्रत्यक्ष चित्रपटाची शुटींग सुरु झाली असून यात श्रीदेवींची धाकटी लेक खुशी कपूर दिसणार आहे… आणि तिच्यासोबत करिष्मा तन्ना झळकणार आहे… नुकतेच, चित्रपटाच्या सेटवरुन काही फोटो लीक झाले आहेत…बॉलिवूड हंगामा रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यातच ‘मॉम २’चं शूट मुंबईत सुरु झालं आहे आणि १० दिवसांचं शूट पूर्णही झालं आहे.
खुशी कपूर हिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं… नंतर ‘लव्हयापा’ आणि ‘नादनियां’ या चित्रपटांमध्ये ती दिसली होती… आणि महत्वाचं म्हणजे ११ नोव्हेंबरला बोनी कपूर यांचा वाढदिवस असूनया दिवशी चित्रपटाची पहिली झलक दाखवणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi