
Banned Movie : भारतासह १०० देशांनी बंदी घातलेला जगातील सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट कोणता?
ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे जगभरातील विविध भाषा आणि विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या आणि आपल्या आवडत्या भाषांमध्ये पाहायला मिळतात. पण जर का तुम्हाला असं सांगितलं की एक असा चित्रपट आहे जो जगभरातील सर्वात वादग्रस्त चित्रपट ठरला होता आणि आता तो कुठल्याच मनोरंजनाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही आहे तर? हो हे खरं आहे. काही चित्रपटांचे विषय किंवा चित्रपटातील काही दृष्य, संवाद वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांच्यात बदल सूचवले जातात. मात्र, १९७५ साली एक इटालियन चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यावर भारतासह १०० देशांनी बंदी घातली होती. (International movies)
तर, १९७५ साली ‘सालो ऑर द 120 डेज ऑफ सोडोम’ (Salò, or the 120 Days of Sodom) हा एक इटालियन चित्रपट प्रदर्शित झाला होता; ज्याला जगातील सर्वात वादग्रस्त चित्रपटांपैकी एक मानलं जातं. या चित्रपटाचं दिग्दर्शन पियर पाओलो पासोलिनी यांनी केलं होतं. ‘सालो ऑर द 120 डेज ऑफ सोडोम’ च्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, चार श्रीमंत आणि भ्रष्ट पुरुष १८ लोकांचं अपहरण करून त्यांच्यावर चार महिन्यांपर्यंत शारीरिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचार करतात. या चित्रपटात राजकीय भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि मानवी क्रौर्य असं अतिशय गंभीर विषय मांडण्यात आले होते. (Films banned in india)

‘अॅनिमल’ (Animal), किल किंवा अन्य दाक्षिणात्य चित्रपटातील हाणामारी आणि हिंसकता प्रेक्षक झेलू शकतात. पण त्याही पलीकडील हिंसक प्रसंग आणि लैंगिक दृश्य दाखवल्यामुळे तब्बल १५० हून अधिक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर २ नोव्हेंबर १९७५ रोजी दिग्दर्शक पियर पाओलो पासोलिनी यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह इटलीतील ओस्तिया समुद्रकिनाऱ्यावर सापडला होता. ‘Salò, or the 120 Days of Sodom’ हा चित्रपट चित्रपटप्रेमी आणि चित्रपट समीक्षक यांच्यात चर्चचा विषय आहे. ओटीटीच्या किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या जगात हा चित्रपट मात्र कुठेही उपलबध नाही आहे. (Entertainment news)
============
हे देखील वाचा : Chhaava : ‘बाहुबली’ सारखी काल्पनिक गोष्ट २ भागांत येते मग शंभू महाराजांची का नाही?
============
दरम्यान, या चित्रपटाव्यतिरिक्त अनेक चित्रपट भारतात विविध कारणांमुळे बॅन करण्यात आले होते. यात ‘फायर’, ‘Parzania’, ‘पांच’ (Paanch) आणि Kama Sutra : The Tale Of Love या चित्रपटांचाही समावेश आहे. (Bollywood news)