Ashi Hi Banwa Banwi :चित्रपटातील लीलाबाई काळभोर यांचा बंगला नेमका

Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले ‘हे’ सिनेमे तुम्ही पाहिलेत का?
ओटीटीवरील कंटेंटचा रसिकांमध्ये वाढता प्रभाव आणि प्रेक्षकांच्या आवडी-निवडींनुसार बदलत चाललेला कल याचा परिपाक म्हणजे आठवड्याच्या टॉप ट्रेंडिंग चित्रपटांची यादी. ऑरमॅक्स मीडियाने नुकताच जाहीर केलेल्या अहवालानुसार, प्रेक्षकांनी या आठवड्यात सर्वाधिक पाहिलेल्या पाच ओटीटी चित्रपटांची यादी समोर आली आहे. प्राइम व्हिडीओ आणि जिओ सिनेमा यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. या यादीत नवोदित कलाकारांपासून ते मोठ्या बजेटच्या चित्रपटांपर्यंत विविध प्रकारचे सिनेमे पाहायला मिळतात, ज्यामुळे प्रेक्षकांची पसंती किती वैविध्यपूर्ण आहे, हे देखील स्पष्ट होतं. चला तर मग नजर टाकूयात या आठवड्यात प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिलेले पाच ओटीटी चित्रपट कोणते आहेत त्यावर.(Top 5 OTT Movies)
१. सरजमिन
सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे सरजमिन. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याचा हा दुसराच चित्रपट असूनही त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. IMDb रेटिंग्स सरासरी असल्या तरी इब्राहिमच्या कामगिरीमुळे आणि चर्चेमुळे हा चित्रपट ओटीटीवर नंबर १ ठरला आहे.

२. हाऊसफुल ५
बॉलीवूडची लोकप्रिय हास्य मालिका ‘हाऊसफुल’चा पाचवा भाग, हाऊसफुल ५, दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर लगेचच हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर आला. २२५ कोटींच्या बजेटवर तयार झालेल्या या सिनेमाने जवळपास २२० कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे ओटीटीवरही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने त्याचा आनंद घेतला.

३. रोंठ
या आठवड्याचा तिसरा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे रोंठ. मल्याळम भाषेतील हा गुन्हेगारी थरारपट आहे, जो जिओ सिनेमा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. उत्तम कथा, मजबूत अभिनय आणि IMDb वर मिळालेली ७.२ रेटिंग यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.(Top 5 OTT Movies)

===========================================
===========================================
४. कुबेरा
कुबेरा या तामिळ-तेलगू द्विभाषिक अॅक्शन चित्रपटाने चौथा क्रमांक पटकावला आहे. धनुष, नागार्जुन, रश्मिका मंदाना, जिम सर्भ आणि दलीप ताहिल यांसारखे दिग्गज कलाकार या सिनेमात आहेत. २० जून रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

५. 3BHK
सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची घर खरेदी करण्याची स्वप्नं आणि त्यामागची कथा मांडणारा 3BHK हा चित्रपट पाचव्या स्थानी आहे. प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याच्या साध्या, भावस्पर्शी कथेमुळे प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे.

तुम्ही अजूनही हे ओटीटी वरचे सिनेमे पाहिले नसतील तर या वीकेंडला नक्की पाहा.