Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Andhera to Maa : या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या धमाकेदार कलाकृती….
थिएटर आणि ओटीटी दोन्ही माध्यमांवर वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट प्रदर्शित होत आहेत… आणि आता गोपाळकाला, स्वातंत्र्यदिन यामुळे लॉंग वीकेंड आल्यामुळे प्रेक्षकांना या आठवड्यात कोणत्या नव्या कलाकृती पाहायला मिळणार जाणून घेऊयात… रिलीज होणाऱ्या या चित्रपट आणि सीरीजमध्ये प्रेक्षकांना ॲक्शन, हॉरर, कॉमेडी, थ्रिलर यांसह इतरही जॉनर पाहायला मिळणार आहेत…
सारे जहां से अच्छा…
अभिनेता प्रतिक गांधी याची प्रमुख भूमिका असणारी ‘सारे जहां से अच्छा’ ‘ही देशभक्तीपर सीरीज १३ ऑगस्ट २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सीरीजची कथा भारतीय गुप्तहेर विष्णू शंकर आणि आयएसआय एजंट मूर्तझा मलिक यांच्याभोवती फिरते. या सीरीजमध्ये अनुप सोनी, सनी हिंदुजा, सुहैल नय्यर, कृतिका कामरा, तिलोत्तमा शोम, रजत कपूर यांच्याही महत्वूर्ण भूमिका आहेत…

तेहरान
अभिनेता जॉन अब्राहम याची प्रमुख भूमिका असणारा ‘तेहरान’ चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटांवर आधारित आहे. यात जॉनसह नीरू बाजवा व मानुषी छिल्लर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत…

अंधेरा
प्राजक्ता कोळी, सुरवीन चावला आणि प्रिया बापट या तीन अभिनेत्रींची मध्यवर्ती भूमिका असलेली ही हॉरर वेब सीरीज १४ ऑगस्ट २०२५ रोजी Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे… या ३ अभिनेत्रींसोबत अभिनेता करणवीर मल्होत्रा देखील दिसणार आहे…

माँ
शैतान या अजय देवगण आणि आर माधवन यांच्या गाजलेल्या थ्रिलर चित्रपटातीस युनिवर्समधील माँ चित्रपट थिएटरनंतर आता ओटीटीवर रिलीज होणार आहे… काजोल हिची प्रमुख भूमिका असणारा या सुपरवनॅचरल हॉरर थ्रिलर चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

================================
हे देखील वाचा : ‘साधना’ चित्रपटासाठी Vyjayanthimala यांनी रात्री १२ वाजता सही का केली होती?
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi