Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

Bigg Boss Marathi Season 6 : आला रे आला…!! बिग

Border 2 चित्रपटाचा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज!

Kishore Kumar याच्या आयुष्यात ‘चार’ या क्रमांकाचे काय महत्व होते?

Pinga g pori pinga: पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नवा

‘आई तेव्हाच होईल जेव्हा मी…’ अभिनेत्री Hruta Durgule हिने आई होण्याबाबत

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर;

Sushmita Sen वयाच्या 50 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने स्वतः

Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna

Human Cocaine चित्रपटाचा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना भावला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, तरुणांना ही चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

 मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना भावला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, तरुणांना ही चित्रपट पाहण्याचे केले आवाहन
Devendra Fadnavis on Swargandharv Sudhir Phadke Movie
मिक्स मसाला

मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना भावला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, तरुणांना ही चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

by Team KalakrutiMedia 30/05/2024

सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव आहे. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी  खूप लोकांना  माहिती आहे, पण त्यांचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. पुष्कळ चढउतार यादरम्यान आले. बाबूजींचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके‘ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी या चित्रपटास पसंती दर्शवली आहे.(Devendra Fadnavis on Swargandharv Sudhir Phadke Movie)

Devendra Fadnavis on Swargandharv Sudhir Phadke Movie
Devendra Fadnavis on Swargandharv Sudhir Phadke Movie

भारतातचं नव्हे तर परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित त्याचबरोबर सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले होते. कलाकारांचे, दिग्दर्शनाचे कौतुक होत असतानाच आता मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील ‘स्वरगंधर्व सुधीर फडके‘ हा चित्रपट तमाम मराठी प्रेक्षकांना, विशेषतः तरुणांनी हा चित्रपट हमखास चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे.

Devendra Fadnavis on Swargandharv Sudhir Phadke Movie
Devendra Fadnavis on Swargandharv Sudhir Phadke Movie

देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असले प्रतिभा संपन्न गायक, संगीतकार सुधीर फडके(बाबूजी) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके आता जगभरात प्रदर्शित झाला आहे. बाबूजींचा जीवनप्रवास, त्यांनी केलेला संघर्ष आणि प्रामाणिक कष्टातून आयुष्याला दिलेली उत्तुंग कामाची झळाळी या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. राष्ट्रप्रेमाचा आणि संगीत कलेचा ध्यास घेऊन आयुष्य सत्कारणी लावणाऱ्या बाबूजींना खऱ्या अर्थाने आदरांजली म्हणून आपण सर्वानी हा चित्रपट पहावा.”

=============================

हे देखील वाचा: जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित ‘पुरुष’ वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

=============================

याबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ”माझ्या मनाला खूप समाधान मिळतेय, आमच्या सर्वांची मेहनत फळाला आली आहे असे म्हणण्यात हरकत नाही. आज प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीकडून चित्रपटाचे तसेच मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून देखील कलाकारांचे आणि चित्रपटाचे  इतके कौतुक होत आहे. चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे मेसेज, फोन येत आहेत.  माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोठी कौतुकाची थाप आहे. यासाठी सर्वांचे मनापासून आभार.” ‘स्वरगंधर्व सुधीर फडके‘ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी या चित्रपटास  पसंती दर्शवली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Devendra Fadnavis Devendra Fadnavis on Swargandharv Sudhir Phadke Movie Devendra Sudhir Phadke Movie Marathi Movie Mrunmayi deshpande sunil barve Swargandharv Sudhir Phadke Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.