‘संगीत देवबाभळी’ फेम Shubhangi Sadavarte पुन्हा अडकणार लग्नबंधनात; 3 महिन्यांआधीच झाला

Madhuri Dixit हिच्या ‘मिसेस देशपांडे’ वेबसीरीजची पहिली झलक आली समोर
धकधक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू चाहत्यांवर दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे… आगामी ‘मिसेस देशपांडे’ (Mrs. Deshpande0 या वेब सीरीजमध्ये पहिल्यांदाच माधुरी एका वेगळ्या रुपात दिसणार आहे… थ्रिलर-ड्रामा असणाऱ्या या सीरीजची पहिली झलक रिलीज करण्यात आली असून तिच्यासोबत यात मराठी अभिनेता देखील दिसणार आहे…
बहुप्रतिक्षित ‘मिसेस देशपांडे’ सीरीजचा टीजर रिलीज झाला असून यात सस्पेन्स, थ्रील प्रेक्षकांना पाहता येणार आहे… बऱ्याच दिवसांपासून या सीरीजची हिंट देणारे फोटो, व्हिडिओ समोर येत होते… माधुरीने (Madhuri Dixit) तिच्या सोशल मिडियावरही तिच्या काही जुन्या चित्रपटांची नावं आणि त्यातील ‘भोली सी सुरत’ हे गाणं टाकत प्रेक्षकांना कोड्यात पाडलं होतं… आता अखेर तिच्या या सीरीजचं नाव समोर आलं आहे…

डिस्नी प्लस हॉटस्टावर मिसेस देशपांडे सीरीजच्या टीजरमध्ये मिसेस देशपांडे शांतपणे भाजी चिरताना आणि ‘भोली सी सूरत’ हे गाणे गुणगुणताना दाखवण्यात आली आहे. त्याचवेळी बाजूलाच सुरू असणाऱ्या रेडिओवर एका सीरियल किलरबद्दल बातमी सांगितली जाते. ८ हत्या करणाऱ्या त्या सीरियल किलरचा अद्याप शोध लागलेला नसल्याचे जाहीर केले जाते. ही बातमी ऐकल्यानंतर मिसेस देशपांडेच्या चेहऱ्यावर एक धडकी भरवणारे हास्य पाहायला मिळते. एकीकडे एक मध्यमवर्गीय गृहिणी आणि दुसरीकडे सीरियल किलर अशा दुहेरी भूमिकेत माधुरी दिसणार आहे... (Entertainment News)
================================
================================
मिळालेल्या माहितीनुसार मराठमोळा सिद्धार्थ चांदेकर माधुरीसोबत या सीरीजमध्ये झळकणार आहे… सिद्धार्थने इन्स्टाग्राम स्टोरीवर सीरीजचा टीजर शेअर केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. माधुरीसह सिद्धार्थ आणि प्रियांशू चॅटर्जी यात सीरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकरही या सीरिजमध्ये दिसणार आहेत. कुकुनूर मुव्हीजच्या सहकार्याने अॅपलॉज एंटरटेनमेंट निर्मित मिसेस देशपांडे ही सीरिज फ्रेंच थ्रिलर ‘ला मान्ते’चं हिंदी वर्जन आहे. ही सीरिज १९ डिसेंबर २०२५ रोजी जिओ हॉटस्टारवर रीलिज होणार आहे. (Madhuri Dixit Web Series)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi