Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Mrunal Thakur : रजनीकांत यांचा Ex जावई धनुष याच्या सोबतचं नातं अखेर अभिनेत्रीने उलगडलं…!
चित्रपटसृष्टीतल कधी कुणाचं सुत कुणाशी जुळेल याचा खरंच काही अंदाज लावता येत नाही… काही दिवसांपासून अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)आणि अभिनेता धनुष (Dhanush) हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या… एका कार्यक्रमात या दोघांनी एकत्र लावलेली हजेरी, एकमेकांना मिठी मारुन भेटणं आणि मृणालने धनुषच्या बहिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करणं या सगळ्यामुळे लोकांनी अदा अंदाज बांधला की धनुष आणि मृणाल एकमेकांना डेट करत आहेत… आता त्यांच्या नात्याबद्दल स्वत: मृणाल ठाकूर हिने मोठा खुलासा केला आहे… काय म्हणाली आहे ती जाणून घेऊयात…(Latest Entertainment News)

तर, सोशल मिडियावर धनुष आणि मृणाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता… त्यात दोघेही एकमेकांचा हात धरून होते. आणि यावरुन मृणाल आणि धनुष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता मृणाल ठाकूरने यावर मौन सोडले आहे आणि धनुषसोबतच्या व्हिडिओमागील सत्य सांगितले आहे. ओन्ली कॉलिवूडशी बोलताना मृणाल हसली आणि म्हणाली की, “माझ्या आणि धनुषमध्ये केवळ मैत्री आहे त्यापलीकडे काहीच नाही आहे…या सगळ्या अफवा आहेत त्यामुळे लोकांनी यावर विश्वास ठेवू नये… तो माझा खुप चांगला मित्र आहे”.(Dhanush Movies)

तसेच, मृणालने यावेळी ‘सन ऑफ सरदार २’ च्या स्क्रीनिंगमध्ये धनुषच्या उपस्थितीबद्दल बोलताना म्हटले की, तो माझ्या आमंत्रणावर आला नव्हता… तर धनुषला अजय देवगनने आमंत्रित केले होते. त्यामुळे कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये..”, असे म्हणत तिने तिच्या आणि धनुषमध्ये कुठलाही नातं नसल्याचं स्पष्ट केलं.. (Celebrity Gossips)
================================
हे देखील वाचा : Dhanush सोबत रिलेशनशिपच्या चर्चेत Mrunal Thakur हिच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष!
=================================
नुकतीच मृणाल ठाकूर अजय देवगणसोबत सन ऑफ सरदार २’ चित्रपटात झळकली होती… तर, धनुष लवकरच ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात क्रिती सेनॉन (Kriti Sanon) दिसणार आहे… हा चित्रपट रांजना युनिवर्समधला दुसरा चित्रपट असणार आहे… त्यामुळे धनुष आणि क्रिती सेनॉन यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक फारच आतुर आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi